file photo
file photo

पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-६० पथकाने गेले तीन दिवस शोधमोहिम राबवली होती. त्याच पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तीन पुरूष, दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले होते. या कारवाईत नक्षली साहित्य, बंदुका, स्फोटके आणि दैनंदीन साहित्य, काडतुसे, मॅगझीन, ३ प्रेशर बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल असा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.

    गडचिरोली : गडचिरोलीत खोब्रामेंढा-हेटाळकास जंगल परिसरात आज झालेल्या चकमकित पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीनंतर शस्त्रसाठा औषधे आणि दैनंदिन वापराची सामग्री मोठ्या प्रमाणात हाती लागली आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-६० पथकाने गेले तीन दिवस शोधमोहिम राबवली होती. त्याच पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तीन पुरूष, दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले होते. या कारवाईत नक्षली साहित्य, बंदुका, स्फोटके आणि दैनंदीन साहित्य, काडतुसे, मॅगझीन, ३ प्रेशर बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल असा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.

    खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात गस्त घालण्यासाठी गेलेल्या सी-६० कमांडोच्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही शोधमोहिम राबविली. त्यासाठी अतिरिक्त जवांनांची तुकडी त्या भागात पाठवण्यात आली आणि आज सकाळी प्लॅनिंग करून एक मोठी चकमक घडली. चकमकीत ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली पोलिसांच्या हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणले जाणार आहेत. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे काम करण्यात येणार आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नक्षल अभियान प्रमुख संदीप पाटील व गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे रूजू झाल्यापासून अनेक मोठ्या नक्षल कारवाई करण्यात आल्या आहेत.