प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील संक्रमितांसह मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. सातत्याने मृतकांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरत आली आहे.

  गडचिरोली (Gadchiroli).  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील संक्रमितांसह मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. सातत्याने मृतकांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरत आली आहे. आज, शनिवारी नव्याने जिल्ह्यात 16 जणांनी प्राण गमावले असून 571 बाधितांची भर पडली आहे. आज मृत्यूसह जिल्ह्यातील मृतकांची संख्या तब्बल 311 एवढी झाली आहे. संक्रमितांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरत असली तरी मात्र कोरोनामुक्तीची टक्केवारी जिल्हा प्रशासनासाठी दिलासा देणारी ठरत आहे.

  आज, जिल्ह्यात 571 नवीन कोरोना बाधितांसह 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 18 हजार 4 बाधितांपैकी 13 हजार 375 कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 4318 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.98 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के झाला.

  मृतकामध्ये छत्तीसगड राज्यातील रुग्ण
  आज कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या 16 रुग्णांमध्ये छत्तीसगड राज्यातील छिंदवाडा येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील 89 वर्षीय पुरुष, ब्रम्हपरी येथील 44 वर्षीय पुरुष, राजूरा येथील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मृतकांमध्ये शहरातील बजरंगनगर येथील 46 वर्षीय पुरुष, गडचिरोली शहरातीलच 51 वर्षीय पुरुष, आरमोरी येथील 42 व 71 वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील 35 व 40 वर्षीय पुरुष, धानोरातील 42 वर्षीय पुरुष, चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील 65 वर्षीय पुरुष, कोरचीतील 55 वर्षीय पुरुष, गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथील 35 वर्षीय पुरुष, कोरची तालुक्यातील बोटेकसा येथील 50 वर्षीय महिला, धानोरा तालुक्यातील चातगाव 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

  बाधितांमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण अधिक
  आज दिवसभरात आलेल्या नव्या 571 बाधितांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. ग्रामीण भागातील बाधितांची वाढणारी ही आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. आज आलेल्या बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 180, अहेरी 52, आरमोरी 25, भामरागड 29, चामोर्शी 41, धानोरा 25, एटापल्ली 31, कोरची 30, कुरखेडा 48, मुलचेरा 12, सिरोंचा 14 तर देसाईगंज तालुक्यातील 84 रुग्णांचा समावेश आहे.

  ३१९ कोरोनामुक्त
  आज दिवसभरात 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. यात गडचिरोलीमधील 148, अहेरी 32, आरमोरी 24, भामरागड 23, चामोर्शी 18, धानोरा 6, एटापल्ली 14, मुलचेरा 3, सिरोंचा 7, कोरची 6, कुरखेडा 11 तर देसाईगंज येथील 27 जणांचा समावेश आहे.