गारपिटीमुळे मक्याची नासधूस; नुकसानग्रस्तांना भरपाई द्या- घोडाम

आरमोरी तालुक्यास १ मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

    आरमोरी (Aarmori).  तालुक्यास १ मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी कॉँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांनी केली आहे.

    आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपूर परिसरात 1 मे रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी चक्रीवादळ, गारपिटीच्या तडाख्याने रबी पिकांचे व कवेलुंच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील रबी धान, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपिटीमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी इश्वर ठाकरे यांनी दिलीप घोडाम यांना दिली.

    याची दखल घेऊन माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मार्गदर्शनात दिलीप घोडाम यांनी पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव, जोगीसाखरा, रामपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पिकाची पाहणी केली. तत्काळ शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे व कवेलूच्या नुकसानीचेही सर्व्हेक्षण करून मदत देण्यात यावी, अशी मागणी घोडाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली.

    यावेळी मोतीलाल लिंगायत, नारायण सरकार, जगन पत्रे, संजय मडावी, इश्वर ठाकरे, कार्तिक मातेरे, भुमेश्वर राऊत, हरिहर मातेरे, उचित मातेरे, मच्छिंद्र मेश्राम, यशवंत मातेरे, बाजीराव बगमारे, विलास पेंदाम, भैय्याजी कन्नाके उपस्थित होते.