corona virus

  • आज ५९ कोरोनामुक्त तर नवीन ११० कोरोना बाधित

गडचिरोली. सक्रिय कोरोना बाधितांपैकी आज जिल्हयात ५९ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील २२, चामोर्शी येथील ९, आरमोरी ३, सिरोंचा ४, अहेरी ३, कुरखेडा १५, धानोरा ३ व मुलचेरा १ असे एकूण ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ११० नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे  ३९ जण बाधित आढळून आले. अहेरी ३, आरमोरी २, चामोर्शी २३ यात सर्व कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे  आहेत. धानोरा १४, कोरची १, कुरखेडा ७, मुलचेरा ३, सिरोंचा १२, वडसा ६ असे आज एकुण ११० नवीन कोरोना बाधित आढळले.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या २९५ झाली असून एकुण बाधित संख्या १४५९ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ११६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा दुदैवी मृत्यू जिल्हयाबाहेर झाला आहे. कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील

५० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर सदर कर्मचाऱ्याची एन्टीजन (RAT) कोरोना चाचणी करण्यात आली व ती सकारात्मक मिळाली. यानंतर सदर मृत कर्मचाऱ्याचे प्रशासनाकडून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. याबाबतचे अधिक तपशील आरोग्य विभागाकडून पुढिल अहवाल तपासणीनंतर देणेत येणार आहेत.