सुसाट वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण वाढले; नागरिकांची डोकेदुखी वाढली

कर्णकर्कश आणि म्युझिकली हॉर्नचा गोंगाट शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फॅन्सी, पोलिस, अँब्युलंसचा सायरन तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्यांसारखा आवाज निर्माण करण्याच्या फॅडमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे.

    गडचिरोली (Gadchiroli).  कर्णकर्कश आणि म्युझिकली हॉर्नचा गोंगाट शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फॅन्सी, पोलिस, अँब्युलंसचा सायरन तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्यांसारखा आवाज निर्माण करण्याच्या फॅडमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे.

    लॉकडाऊन संपल्यानंतर वाहने सुसाट सुटली. दिवाळीत फटाके फुटले. या काळात ध्वनिप्रदूषण मोठे वाढले. आता रस्त्यांवर वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे अपघात घडू लागले आहेत. दुचाकींना हॉर्न बसविण्यासह सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून मोठा आवाज निर्माण केला जातो. एकूणच कर्णकश आणि म्युझिकली हॉर्नच्या दणदणाटाने चांगलेच कानठल्या बसल्या आहेत. RTO आणि वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.