Online exams on mobile; Students of Gadchiroli reached directly in the forest of Chhattisgarh and

शहरी भागात मोबाईल नेटवर्क चांगले असले तरी ग्रामीण भागात अद्यापही नेटवर्क मिळत नाहीत. गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण, कोरची परिसरात दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळव्याकरीता विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली.

    गडचिरोली : मार्च २०२० मध्ये देशात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे नये याकरिता सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परिक्षा देखील ऑलनाईनच घेतल्या जात आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थी विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेपर सुरु झाला तरी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनीना छत्तीसगडच्या जंगलात जाऊन पेपर द्यावा लागत आहे.

    शहरी भागात मोबाईल नेटवर्क चांगले असले तरी ग्रामीण भागात अद्यापही नेटवर्क मिळत नाहीत. गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण, कोरची परिसरात दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळव्याकरीता विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली.

    काही विद्यार्थ्यांना २५ ते ३० किमी अंतर पार केल्यांनतर गोंदिया जिल्ह्यातील चिंचगड येथे तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन नेटवर्क मिळाले. यामुळे घरापासून दूर जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. नेटवर्कच्या व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं.

    ऑनलाईन पेपर सोडवताना काही अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला कळवावं. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे.