गडचिरोलीत जमावबंदीचा आदेश; असे असतील निर्बंध

  गडचिरोली (Gadchiroli) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. (corona is increasing) या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा (the Gadchiroli district) प्रशासनाकडून (administration) सभा, मिरवणूक, लग्न समारंभ (meetings, processions, weddings) व यात्रा उत्सव (yatra celebrations) यांच्यावर निर्बंध (restrictions) लादण्यात आले आहेत. तसंच विविध सण-उत्सवांमुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  कोणत्या गोष्टींना राहणार मनाई?
  शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू सोबत नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडण्याची किंवा फेकण्याची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

  व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, ज्यामुळे सभ्यता किंवा नितीमत्ता यांस धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे, अशा गोष्टींनाही मनाई करण्यात आली आहे.

  मिरवणुकीला परवानगी लागणार
  उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.