bear attack on men in kurkheda gadchiroli

कुरखेडा. जंगलात मशरूम आणण्यासाठी गेलेला इसम अस्वलाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास कुरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत गोठणगाव क्षेत्रातील खैरी बिटाच्या जंगलात घ घडली यादव गोविंदा राऊत वय पन्नास वर्ष राहणार मालदुगी असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार यादव राऊत आज सकाळी गावानजीक असलेल्या खैरी च्या जंगलात मशरूम आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात राऊत गंभीररित्या जखमी झाले  त्यांना उपचारासाठी  येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जखमीला गडचिरोली येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळतात कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी तथा  विभागीय वन अधिकारी सुनील सोनटक्के यांनी रुग्णालयात जाऊन जखमी इसमाची विचारपूस केली व उपचारासाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत केली.