गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक, महिला नक्षलवाद्याचा मृत्यू

पोलिसांत आणि नक्षलींमध्ये चमकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली तळ सोडून पसार झाले. शोध घेतल्यावर एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. ही महिला नक्षली प्लाटूनची सदस्य इंदिरा असल्याची माहिती मिळाली आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात दुलंदा जंगलात पोलीस आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. या चकमकीमध्ये एका महिला नक्षलीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ( female Naxalite killed) गडचिरोलीतील नक्षल विरोधी पोलीस पथकाच्या जवानांना दुलंदा जंगलात नक्षली तळ असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी शोध मोहीम राबविली होती.(Police and Naxals clash in Gadchiroli)

यादरम्यान पोलिसांत आणि नक्षलींमध्ये चमकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली तळ सोडून पसार झाले. शोध घेतल्यावर एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. ही महिला नक्षली प्लाटूनची सदस्य इंदिरा असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच नक्षल तळावरुन मोठ्या प्रमाणात साहित्य आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.