नगरपंचायत प्रशासनातर्फे सॅनिटायझर फवारणी मोहीम

जिल्ह्यातसह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानाची सॅनिटायझर वाहनाने फवारणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

    चामोर्शी (Chamorshi).  जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानाची सॅनिटायझर वाहनाने फवारणी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

    शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाचे आदेशानुसार शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद असतात. त्यामुळे फवारणी करणे सोयीचे होते. त्यामुळे 24 एप्रिल रोजी शहरातील मुख्य मार्गलगत दुकान भागाची, रस्त्याचे ट्रॅक्टर वाहनाने फवारणी करण्याचे काम केले गेले. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले, अशा भागात पंपाद्वारे फवारणी नगरपंचायत येथील सफाई कामगारांनी केली. नगरपचायंत प्रशासन निर्जंतुकीकरण मोहीम ही ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जाते तेवढा भाग फवारणी करण्यात येणार असून ज्या ठिकाणी फवारणी ट्रॅक्टर जात नाही.

    अशा अंतर्गत रस्ते, गल्ल्याचे निर्जंतुकीकरण पंपाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी नगरपंचायतचे अभियंता निखिल करेकर यांच्या देखरेखीखाली हाफिज सय्यद, नगरपंचायत सफाई कर्मचारी काम करीत आहेत.