sironcha officer

येथील पंस कार्यालयात कार्यरत महिला शिपाई कर्मचारीस वरिष्ट अधिकारीने अश्लिल व्हीडिओ पाठविण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाबाबत दै. नवराष्ट्रने सातत्याने पाठपुरावा करीत सुधाकर निमसरकार या वादग्रस्त अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. जिप मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी यांसबंधी सिरोंचा पंस कार्यालयास पत्र निर्गमित करून निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दै. नवराष्ट्रने  सातत्याने केलेल्या पाठपुराव्या अखेर यश आले आहे.

गडचिरोली (सिरोंचा).  येथील पंस कार्यालयात कार्यरत महिला शिपाई कर्मचारीस वरिष्ट अधिकारीने अश्लिल व्हीडिओ पाठविण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाबाबत दै. नवराष्ट्रने सातत्याने पाठपुरावा करीत सुधाकर निमसरकार या वादग्रस्त अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. जिप मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी यांसबंधी सिरोंचा पंस कार्यालयास पत्र निर्गमित करून निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दै. नवराष्ट्रने  सातत्याने केलेल्या पाठपुराव्या अखेर यश आले आहे.

येथील पंस कार्यालयात आस्थापना विभागात कार्यरत सहायक प्रशासन अधिकारी सुधाकर निमसरकार यांच्यावर कार्यालयातीलच एका महिला परिचरला मोबाईलवरून अश्लिल व्हीडिओ पाठवल्याचे तसेच पुरावा नष्ट केल्याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपी निमसरकार यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जिप प्रशासनाने चौकशी समितीची नेमणूक करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

सदर अधिकाऱ्याची रंगेल वृत्ती लक्षात  घेता दै. नवराष्ट्रने पीडित महिलेला न्याय देण्याच्या उद्देशाने सातत्याने सदर प्रकरण उचलून धरले होते. चौकशीअंती ५ ऑक्टोबर रोजी वादग्रस्त अधिकारी निमसरकार यास निलंबित केले. यासंबंधी जिप प्रशासनाचे सीईओ यांचे पत्र सिरोंचा पस कार्यालयास प्राप्त झाले आहे. निलंबन काळात वादग्रस्त अधिकारी निमसरकार यास आरमोरी पंस कार्यालयात सेवा देण्याचे आदेशात म्हटले आहे. निमसरकार याच्या वादग्रस्त कार्यकाळाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखरे या बाबींची सीईओ यांनी दखल घेत निमसरकार यास निलंबित केले आहे.