st bus

एसटी महामंडळांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्यांना अल्प वेतनावर काम करीत असतानाच अनियमित वेतनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले.

गडचिरोली. एसटी महामंडळांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्यांना अल्प वेतनावर काम करीत असतानाच अनियमित वेतनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून तीन महिन्यांचे थकीत वेतन ७ ऑक्टोबरपर्यंत देण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने ९ ऑक्टोबरला आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तरीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन करून वेतन देण्याची मागणी केली.

आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष वहाब यासिनी, विभागीय सचिव विठ्ठलराव गेडाम, कोषाध्यक्ष विलास वानखेडे, रमेश जाधव, आगार अध्यक्ष जगन्नाथ इंगळे, आगार सचिव नितेश मडावी, अहेरी आगार अध्यक्ष मुनशद कुरेशी, आगार सचिव अशरफ कुरेशी, ब्रह्मपुरी आगार अध्यक्ष, सचिव व कामगार संघटनेचे कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.