चंद्रपूरनंतर आणखी एका जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यावर राज्य शासनाचा विचार

चंद्रपुरातील दारुबंदी हटविल्यानंतर राज्य शासनाकडून (the state government) आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा विचार (lifting the curfew in another district) सुरू केला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचे संकेत (the ban on alcohol in Gadchiroli district) दिले आहेत.

  गडचिरोली (Gadchiroli).  चंद्रपुरातील दारुबंदी हटविल्यानंतर राज्य शासनाकडून (the state government) आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा विचार (lifting the curfew in another district) सुरू केला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचे संकेत (the ban on alcohol in Gadchiroli district) दिले आहेत. यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनीही या विषयी सकारात्मकता दर्शविली आहे.

  चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले. तर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

  दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी
  तर वडेट्टीवार यांनी दारुबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली. दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारुबंदीला उठवण्याची एकप्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.

  सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारुबंदी उठवली
  ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लो दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.

  दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. हा अहवाल मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.