गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात (the border areas of Chhattisgarh) माओवाद्यांच्या हालचाली (The movement of Maoists) वाढलेल्या आहेत. माओवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री जांबिया गट्टा पोलिस ठाण्यावर (the Zambia Gatta police station) हल्ल्या करण्याचा प्रयत्न (The Maoists tried to attack) केला होता. पोलिसांनी तो हल्ला परतवून लावला.

    गडचिरोली (Gadchiroli).  जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात (the border areas of Chhattisgarh) माओवाद्यांच्या हालचाली (The movement of Maoists) वाढलेल्या आहेत. माओवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री जांबिया गट्टा पोलिस ठाण्यावर (the Zambia Gatta police station) हल्ल्या करण्याचा प्रयत्न (The Maoists tried to attack) केला होता. पोलिसांनी तो हल्ला परतवून लावला.

    मोरचुलच्या जंगलात गुरुवारी सकाळी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. राजा उर्फ राम साई आणि रणीता ऊर्फ पुनिता गावडे असे मृतकांचे नाव आहे. माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलिस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सी-६०च्या पथकाने जंगलात कारवाई करीत दोन माओवाद्यांना ठार केले.

    गुरुवारी सकाळपासून धानोरा तालुक्यात सावरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत जंगलात मोठ्या प्रमाणात माओवादी एकत्र असल्याची माहिती माओवादविरोधी विरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांना मिळाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० कमांडो पथकाचे अभियान सुरु असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.

    प्रत्युत्तरात जवानांनी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी जंगलातून पळून गेले. घटनास्थळी पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता दोन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच एक एसएलआर बंदुक, एक पिस्तुल, कुकर बॉम्ब, आयडी स्फोटके त्या ठिकाणी सापडली. गुरुवारी दुपारी हेलिकॉप्टरने दोन्ही मृतदेह गडचिरोलीत शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांची ओळख पटवण्यात आली.