दुर्योधन रायपुरे, सामाजिक कार्यकर्ते
दुर्योधन रायपुरे, सामाजिक कार्यकर्ते

सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे (Social worker Duryodhan Raypure) यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आपली सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आणि मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या (Five accused arrested) आहेत.

    गडचिरोली (Gadchiroli). सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे (Social worker Duryodhan Raypure) यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आपली सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आणि मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या (Five accused arrested) आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हत्या करण्यामागचं कारण समोर आल्यावर सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

    रायपुरे यांच्या हत्ये प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी गडचिरोली नगरपरिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे (Gadchiroli Nagar Parishad Chairman Prashant Khobragade) आहे. प्रशांत खोब्रागडे यानेच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

    दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्याने होते. गोरगरीब नागरिकांची कामे करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. दरम्यान 24 जून रोजी राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे फिरवली असता, पहिल्या आरोपीला गोंदिया येथून अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आणखी चार जणांना गोंदिया जिल्ह्यातूनच अटक करण्यात आली. चौघांचीही चौकशी केली असता नगरपालिकेचे सभापती प्रशांत खोब्रागडे यांनी दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानंतर सभापती प्रशांत खोब्रागडे यालाही गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

    आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय अडथळा बाजूला करण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपुरे यांना संपवण्याचा कट प्रशांत खोब्रागडे यांनी रचला. यासाठी प्रशांत खोब्रागडे याने गोंदिया जिल्ह्यातील पाच जणांना पाच लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी 50 हजार रुपये अदा करण्यात आले होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी दिली आहे.