पशुपक्ष्यांसाठी उभारली पाणपोई ; फुले महाविद्यालयाचा पर्यावरण पूरक उपक्रम

मानवासह पशुपक्ष्यांनाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची नितांत गरज असते. पशुपक्ष्यांना पाण्याची सोय निर्माण व्हावी, यासाठी आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून आष्टी-मार्कंडा मार्गावर पशुपक्ष्यांकरिता पाणपोईची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

    आष्टी (Ashti).  मानवासह पशुपक्ष्यांनाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची नितांत गरज असते. पशुपक्ष्यांना पाण्याची सोय निर्माण व्हावी, यासाठी आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून आष्टी-मार्कंडा मार्गावर पशुपक्ष्यांकरिता पाणपोईची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

    वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम उर्फ बबलू हकीम उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्कंडा मार्गावर कुठेही पशुपक्ष्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे लक्षात येताच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून या मार्गावर पशुपक्ष्यांकरीता पाणपोईची सुविधा निर्माण करण्यात आली.

    या तृष्णा पशुपक्षी पाणपोईच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य मंडल, प्रा. बी. के. राठोड, प्रा. हिरादेवे होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, प्रा. डॉ. राज मुसने, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. श्याम कोरडे, प्रा. रवी गजभिये, राज लखमापुरे, निलेश नाकाडे, लक्ष्मण दूरशेट्टी, दडजाम, विनोद तोरे, दिलीप मडावी, मोहम्मद मुस्ताक उपस्थित होते.