KTM 250 Duke नवीन स्टायलिश LED हेडलँप सह झाली लाँच

KTM भारतीय बाजारात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. कंपनीची भारतातल्या 365 शहरांत 450 ऑउटलेट्स आहेत. याशिवाय कंपनी बाजारात आपल्या मॉडेल्सना अपडेट करत नवीन मॉडेल्सही सादर करत असते.

2020 KTM 250 Duke किंमत आणि फीचर्स: प्रमुख दुचाकी वाहन निर्माती कंपनी KTMने या वर्षाच्या सुरूवातीलाच आपल्या व्हेइकल लाइनअपला नवीन BS6 प्रमाणित इंजिनासह अपडेट करत लाँच करणे सुरू केले आहे. आता कंपनीने आपली लोकप्रिय बाइक KTM 250 Dukeला स्टायलिश  LED हेडलँपसह बाजारात लाँच केले आहे. यात देण्यात आलेल्या डे टाइम रनिंग लाइट्समुळे याचा लूक अधिकच आकर्षक झाला आहे.

बाइकच्या हेडलाइट्स 390 मॉडेलशी खूपच मिळत्याजुळत्या आहेत. याशिवाय यात ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS)चाही प्रयोग करण्यात आला आहे. ही बाइक गडद काळा आणि सिल्वर मॅटालिक अशा दोन नव्या रंगात बाजारात दाखल झाली आहे. पूर्वी या बाइकची किंमत 2,04,698 रुपये होती, यात आता वाढ होऊन 2,09,280 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.

कंपनीची लोकप्रिय बाइक 390 Duke च्या धर्तीवर या बाइकमध्येही कंपनीने सुपरमोटो मोडसह ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिलेली आहे, जी फक्त एक बटन पुश केल्यानंतर ॲक्टिवेट होते. रेस ट्रॅकवर ही सिस्टिम खूपच उपयोगी आहे. ही सिस्टिम फक्त ABSला कंट्रोल करते आणि मागच्या भागातील डिस्क ब्रेकला स्वीचऑफ करते. यामुळे व्हील लॉक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

कंपनीने या बाइकमध्ये 248.8cc क्षमतेच्या लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर युक्त इंजिनचा वापर केला आहे. जे 29.6 hp ऊर्जा आणि  24 Nmचा टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड ट्रांसमिशन गिअरबॉक्स दिला आहे. यासोबतच यात स्लीपर क्लच आणि प्री लोडेड ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे, यामुळे उत्तम रायडिंग क्वालिटीचा अनुभव घेता येईल.

KTM भारतीय बाजारात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीची भारतात 365 शहरात 450 ऑउटलेट्स आहेत. याशिवाय कंपनीने बाजारात आपली मॉडेल्स अपडेट करत नवीन मॉडेल्सही सादर केली आहेत. तरुणांमध्ये या कंपनीची क्रेझ वाढत असून नेक्ड स्पोर्ट बाइक म्हणून कंपनीची मॉडेल्स खूपच प्रसिद्ध आहेत.