64MP कॅमेरा + 5,020 mAh बॅटरी ; 20 हजारांहून कमी किंमतीच्या दमदार स्मार्टफोनचा आज ‘फ्लॅश-सेल’

‘शाओमी’ कंपनीचा ‘रेडमी नोट 9 प्रो मॅक्स’ हा दमदार स्मार्टफोन पुन्हा एकदा भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तब्बल 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये 5,020 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

‘शाओमी’ कंपनीचा ‘रेडमी नोट 9 प्रो मॅक्स’ हा दमदार स्मार्टफोन पुन्हा एकदा भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तब्बल 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये 5,020 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. Redmi Note 9 Pro Max च्या विक्रीसाठी आज (दि. २ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपासून अ‍ॅमेझॉन आणि mi.com या संकेतस्थळांवर ‘फ्लॅश सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफिटची ऑफर मिळणार आहे. 298 आणि 398 रुपयांच्या प्लानवर ही ऑफर मिळेल.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स स्पेसिफिकेशन्स :

भारतात रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला असून 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 64 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
>> फोनमध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी
>> ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये फोन उपलब्ध
>> या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट
>> NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसित केलेले तंत्रज्ञान
>> हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे.
>> जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.
>> ड्युअल सिम सपोर्ट
>> 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले
>> ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर
>> 8 जीबी रॅम
>> फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही
>> मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप
>> 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
>> 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स,
>> 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे
>> एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत
>> रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही
>> 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी
>> कनेक्टिविटीसाठी 4जी व्हीओएलटीई,
>> वाय-फाय 802.11 एसी,
>> ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस,
>> इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक
>> युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स किंमत :

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 16,999 ₹, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 ₹ आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19,999 ₹ झाली आहे.