फेसबुकवर दिसणार TikTok सारखे शॉर्ट व्हिडिओ, आलं नवं फीचर

सोशल मीडिया ॲप फेसबुकवर अनेक युजर्सचा शॉर्ट व्हिडिओ टिकटॉक सारखा अंदाज पाहायला मिळत आहे आणि कंपनी लवकरच या फीचरची अधिकृत घोषणाही करू शकते. या फीचरची टेस्टिंग काही युजर्ससोबत करण्यात येत आहे आणि भारतात टिकटॉक ॲप बॅन केल्यानंतर फेसबुकसाठी हे नवीन फीचर आणण्याची ही उत्तम संधी आहे. इंस्टाग्रामवर यापूर्वीच हे फीचर आलं आहे.

नवी दिल्ली : भारत सरकारने जूनच्या अखेरीस  59 चाइनीज ॲप्स बॅन केले आहेत. याचा सर्वाधिक फटका शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म TikTok ला बसला आहे. या ॲपचे भारतात कोट्यावधी युजर्स होते आणि डाउनलोडच्या बाबतीत याने फेसबुकलाही मागे टाकलं होतं. भारतात ॲप बॅन केल्यानंतर त्याला पर्याय म्हणून अनेक ॲप्स आहेत पण आता फेसबुकही टिकटॉक सारखं फीचर आपल्या अधिकृत ॲपमध्ये समाविष्ट करणार आहे.

सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या इंस्टाग्राम ॲपमध्ये Reels नावाने शॉर्ट व्हिडिओ शेअरिंगचे फीचर दिले आहे आणि आता अधिकृत ॲप फेसबुकमध्येही असा ऑप्शन येणार आहे. फेसबुक ॲपवर युजर्सला शॉर्ट व्हिडिओ दिसत आहेत आणि स्वाइप अप केल्यानंतर युजर्स एकानंतर दुसरा याप्रमाणे व्हिडिओ पाहू शकणार आहे. याचा इंटरफेस टिकटॉकशी काहीसा मिळताजुळताच देण्यात आला आहे. ‘गैजेट्स नाउ’ हिंदीच्या टीमने स्वत: या फीचरचा वापर आणि चाचपणी केली.  

टिकटॉक बॅनचा फायदा

फेसबुकच्या वतीने अधिकृतपणे नवीन फीचरबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलं नाही पण भारतीय युजर्सला टिकटॉकसारखा ऑप्शन देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कंपनी याचा पूर्णपणे फायदा घेणार आहे आणि आधीपासूनच असलेल्या मोठ्या युजरबेसला या नवीन फीचरवरही शिफ्ट करण्याची इच्छा आहे. या फीचरमध्ये युजर्सला Create Short Video चा ऑप्शनही दिला आहे, ज्यावर टॅप करताच फेसबुक कॅमेरा ओपन होतो.

इंस्टाग्रामवर Reels फीचर

सोशल मीडिया तज्ज्ञ मैट नवारा यांच्या मते, या फीचरची चाचणी करण्यात येत आहे आणि सर्व युजर्सला लवकरच ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने आधीच आपल्या इंस्टाग्राम ॲपवर रील्स अधिकृतरित्या लाँच केलं आहे. यात युजर्स आपल्या पसंतीची ऑडियो क्लिप निवडू शकतात आणि त्यावर लिंक सिंक करून व्हिडिओ तयार करू शकतात. सोबतच अनेक क्रिएटिव्ह फिल्टर्सही देण्यात आले आहेत. हे रील्स स्टोरीप्रमाणेच 24 तासांसाठीही पोस्ट करण्याची सुविधा आहे.