एअरटेल, वोडाफोनचा इंटरनेट स्पीड सुधारला, Reliance Jioच अद्यापही नंबर १

ट्रायच्या लेटेस्ट डेटानुसार एअरटेल आणि वोडाफोनच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये सुधारणा झाली आहे. याही वेळेला नेहमीप्रमाणेच रिलायन्स जिओनेच सर्वात पुढे राहून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पण, अपलोड स्पीडच्या बाबतीत सर्व कंपन्यांची कमागिरी ही निराशाजनकच राहिलेली आहे.

नवी दिल्ली : एअरटेल आणि वोडाफोनच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये सुधारणा झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (Trai) ने जुलै 2020 चा डेटा जारी केला आहे, यात या दोन्ही कंपन्यांच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. जूनच्या तुलनेत या दोन्ही कंपन्यांनी चांगली कामगिरी केली, पण आयडियाच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये घसरण झाली आहे. तर रिलायन्स जिओचा जुलै 2020 मधील 4G डाउनलोड स्पीडमध्ये काहीही बदल झालेला नाही आणि ही स्थिती जून 2020 प्रमाणेच होती.रिलायन्स जिओच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये जून आणि जुलैमध्ये काहीही बदल झालेला नाही. हा आताही 16.5Mbps स्पीडसह या स्पर्धेत सर्वांच्या पुढेच आहे. अपलोड स्पीडबाबत सांगायचं झालं तर यात कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरच्या सेवेत कोणतीही वाढ झाली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

वोडाफोन, एअरटेलचा 4G स्पीड सुधारला

वोडाफोनने जुलैमध्ये आपल्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये कंपनीचा डाउनलोड स्पीड 7.5Mbps होता, यात जुलैमध्ये वाढ होऊन तो 8.3Mbps झाला आहे. दुसरीकडे एअरटेलबाबत बोलायचं झालं तर याचा 4G स्पीड जुलैमध्ये 7.3Mbps होता तर जूनमध्ये 7.2Mbps होता. आयडियाच्या 4G डाउनलोड स्पीडमध्ये घसरण होऊन तो 7.9 Mbps झाला तर मे महिन्यात तो 8Mbps असल्याची नोंद झाली होती.

अपलोड स्पीडमध्ये कोणताही बदल नाही

सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अपलोड स्पीडमध्ये जुलै महिन्यात घसरण झाली. एअरटेल जूनमध्ये आपल्या युजर्सला 3.4Mbps चा स्पीड देत होती, यात जुलैमध्ये घसरण होऊन हे प्रमाण 3.3 वर आले. अशाप्रकारे आयडियाच्या अपलोड स्पीडमध्ये जुलैमध्ये घसरण होऊन तो 5.7 Mbps झाला जो जूनमध्ये 6.2Mbps होता. रिलायन्स जिओच्या अपलोड स्पीडमध्ये 0.1Mbps चा फरक दिसून आला. कंपनी जून मध्ये 3.4Mbps चा अपलोड स्पीड ऑफर करत होती, पण जुलैमध्ये यात घसरण होऊन तो 3.3Mbps झाला. तर वोडाफोनविषयी सांगायचं झालं तर जूनच्या 6.2Mbps च्या तुलनेत जुलैमध्ये घसरण होऊन तो 6.1 Mbps झाला होता.