amazon great indian festival sale rs 4000 discount on xiaomi smartphones redmi note 9 to redmi note 9 pro
फेस्टिव ऑफर्सः ॲमेझॉन Great Indian Festival सेलमध्ये 'शाओमी'चाच डंका; स्मार्टफोन्सवर मिळणार 'एवढ्या हजारां'ची सूट

ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर Great Indian Festival सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या उत्पादनावर वेगवेगळे डिस्काऊंट मिळत आहे. स्मार्टफोन्स खरेदी वर छप्पर फाडके सूट मिळत आहे. वाचा डिटेल्स.

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट ॲमेझॉन इंडियावर १७ ऑक्टोबर पासून Great Indian Festival सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये मोबाइलसह टीव्ही, अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ग्रोसरी प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळत आहे.

Redmi Note 9 Pro Max वर ३ हजारांची सूट

रेडमी नोट प्रो मॅक्स (6GB + 64GB) ची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. या सेलमध्ये हा फोन 15 हजार 999 रुपयात खरेदी करता येवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले, 64MP + 8MP + 5MP + 2MP चा रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे.

Redmi Note 9 Pro वर ४ हजारांची सूट

हा फोन 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजमध्ये येतो. सेलमध्ये 16 हजार 999 रुपये किंमतीचा फोन 12 हजार 999 रुपयांत खरेदी करता येवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले, 48MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी मिळते.

Redmi Note 9 वर ४ हजारांची सूट

या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी मॉडलवर ४ हजारांची सूट मिळाल्यानंतर हा फोन 12 हजार 499 रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये 48MP + 8MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा तसेच 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 5020mAh ची बॅटरी दिली आहे.

Redmi 9 वर २ हजारांची सूट

रेडमीच्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन 8 हजार 499 रुपयांत खरेदी करता येऊ शकेल. स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले, 13MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, मीडियाटेक हिलियो जी 35 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी मिळते.

Redmi 9A वर २ हजारांची सूट

या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये या फोनला 6 हजार 499 रुपयात खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी मिळते. यात 2 जीबी रॅम प्लस 32 जीबी स्टोरेज दिलं आहे.