Amazon Halo फिटनेस बँड झाला लाँच, करणार बॉडी स्कॅनिंग

Amazon ने आपला खास Amazon Halo फिटनेस बँड अमेरिकेत लाँच केला आहे. हा फिटनेस बँड युजर्सला फिटनेस ट्रेकिंग आणि हृद्याच्या ठोक्यांपासून ते शरीरात चरबीचे प्रमाण किती आहे याची माहिती देणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेताना असे अनेक फिटनेस बँड बाजारात आले आहेत. यामुळेच Amazon ने ही आपला फिटनेस बँड लाँच केला आहे.

Amazon Halo Specifications

Amazon च्या लेटेस्ट Amazon Halo फिटनेस बँडमध्ये डिस्प्ले दिलेला नाही. या बँडमध्ये कार्डियो, शरीरातील चरबीचे प्रमाण आणि टोन ट्रॅकिंग सारखे फीचर्स दिले आहेत. याचं विशेष फीचर हे आहे की, यात बॉडी स्कॅनिंग दिलं आहे, ज्यात शरीरात चरबीचे प्रमाण किती आहे यासंबंधी माहिती मिळते. पण यासाठी युजर्सला मेंबरशिप विकत घ्यावी लागणार आहे. युजर्सला मोबाइलच्या एका ॲपचा वापर करून या बँडचा उपयोग करता येणार आहे. कंपनीने या फिटनेस बँडमध्ये दोन मायक्रोफोन दिले आहेत, ज्यात एका बटणाच्या माध्यमातून ऑन आणि ऑफ करता येणार आहे. याशिवाय या बँडमध्ये एलईडी इंडिकेटर लाइट दिली आहे.

Amazon Halo Price

Amazon Halo फिटनेस बँडची किंमत 64.99 डॉलर (जवळपास 4,764 रुपये) आहे. हे कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. पण, कंपनीने हा बँड भारतात लाँच होणार का याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.