Bobble AI तर्फे मराठी कीबोर्डची घोषणा

जगातील सर्वांत शक्तिशाली कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून बॉबल एआयने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मराठी भाषिकांसाठी मराठी कीबोर्ड आणला आहे.

मुंबई : मराठी ही भारतातील, प्रामुख्याने महाराष्ट्रातील ७२ दशलक्ष लोकांसाठी, बोलण्याची प्रथम भाषा आहे आणि ३ दशलक्ष लोकांसाठी द्वितीय भाषा आहे. ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकांकडून वापरली जाणारी भाषा आहे. भाषेला पूर्णपणे समर्पित (डेडिकेटेड) असा कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म पुरवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण, भाषांतरामध्ये संभाषणाचा संपूर्ण सारच हरवून जातो. भारतातील स्थानिक संवादातील आव्हाने सर्वप्रथम समजून घेणारा तसेच प्रादेशिक भाषांमध्ये अस्खलित संवादासाठी प्लॅटफॉर्म पुरवण्याचे ध्येय ठेवणारा, जगातील सर्वांत शक्तिशाली कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून बॉबल एआयने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मराठी भाषिकांसाठी मराठी कीबोर्ड आणला आहे.

भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी हा सर्वांत सुलभ मार्ग आहे. अनेकदा तो प्रत्यक्ष संवादाहून सुलभ वाटतो. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या श्रेणी १ शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इमोजीजच्या वापरात १४ टक्के वाढ झाल्याचे बॉबल एआयला आढळले आहे. बॉबलचा मराठी कीबोर्ड हा मराठीत टेक्स्ट करण्यासाठी अँड्रॉइडवरील सर्वात वेगवान आणि नवीनतम मराठी इनपुट टूल आहे. यात एकतर मराठी टाइप करून किंवा बॉबलच्या कीबोर्डचा वापर इंग्रजी ते मराठी अनुवादकाच्या स्वरूपात करून वापरकर्ते टेक्स्ट करू शकतात. बॉबल एआयने व्हॉट्सॲपवरून ॲनिमिटेड स्टिकर्स पाठवण्यासाठी एक नवीन सुविधा समाविष्ट केली आहे. ॲनिमेटेड बिगमोजी सर्वांसमोर आणणारा बॉबल एआय हा जगातील पहिला प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्ते केवळ लाँग प्रेस करून इमोजी पॅनलमधील इमोजी भव्य स्वरूपात पाठवू शकतात. कंपनीने बाप्पांच्या स्वागतासाठीही खास इमोजीज आणल्या आहेत.

बॉबल एआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रसाद नवीन कीबोर्डची घोषणा करतेवेळी म्हणाले, “आपण वैविध्यपूर्ण आणि आपल्या मातृभाषेतील प्रभावांशी जवळते नाते असलेल्या लोकांच्या देशात राहतो याचा आपल्याला कायम अभिमान वाटतो. प्रत्येक संभाषणात २ किंवा ३ वाक्यांनंतर इमोजी येते. बॉबल्स एआय लक्षावधी भारतीयांना १००हून अधिक भाषांमध्ये संवाद साधण्याची व आशय व्यक्त करण्याची शक्ती देत आहे.