apple event 2020 apple launched watch se watch series 6 ipad
Apple Event 2020 : अ‍ॅपलने लाँच केली नवीन वॉच सीरिज, आयपॅड

अ‍ॅपलने एका खास कार्यक्रमाच्या (apple event 2020) माध्यमातून नव्या उत्पादनाचं लाँचिंग (launch) केले. कोरोना (corona) संकट असल्याने संपूर्ण सोहळा ऑनलाईन (online event) पार पडला. अ‍ॅपलने नवीन वॉच सीरिज (watch series), आयपॅड (iPad), आयपॅड एअर लाँच केलं आहे. यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहेत. कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीने स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं (oxygen in blood) प्रमाण मोजणारे फीचर दिले आहे.

iPad (8th generation) मध्ये पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला असून गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. वाय-फाय मॉडेल, वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेल अशा विविध सुविधांसह आयपॅड उपलब्ध होईल. त्यात ३२ जीबी आणि १२८ जीबी असे पर्याय आहेत. त्यांची किंमत २९ हजार ९०० रुपयांपासून ४१ हजार ९०० ₹पर्यंत असेल.

आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत ५४ हजार ९०० ₹पासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत ६६ हजार ९०० ₹पासून सुरू होईल. ६४ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असेल.