Asus enters commercial PC market with Expert Series launch
‘एक्सपर्ट सिरीज’ लाँचसह आसूसचा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश

लॅपटॉप्स (laptops),  डेस्कटॉप्स (Desktop) आणि ऑल-इन-वन्समधील 11 मॉडेल्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह सर्वच की एंटरप्राइझेस व सर्व क्षेत्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेत विंडोज10 प्रो सपोर्टसह 10 व्या जनरल इंटेल प्रोसेसरचा समावेश आहे.

मुंबई : संगणक हार्डवेअर (computer hardware) आणि इलेक्ट्रॉनिक्स (electronics) क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने(Asus India) कमर्शियल पीसी मार्केटमध्ये (PC Market) प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ (expert series) ब्रँडही (brand) लाँच (launch) केला आहे. यात लॅपटॉप्स (laptops),  डेस्कटॉप्स (Desktop) आणि ऑल-इन-वन्समधील 11 मॉडेल्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह सर्वच की एंटरप्राइझेस व सर्व क्षेत्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेत विंडोज10 प्रो सपोर्टसह 10 व्या जनरल इंटेल प्रोसेसरचा समावेश आहे.

एक्सपर्ट सिरीजसह, आम्ही उद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविण्य आणि आमच्या वाणिज्यिक संगणकाचे अद्वितीय असे प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देत असल्याचे आसूस इंडिया व दक्षिण आशियाचे सिस्टम बिझिनेस ग्रुपचे रीजनल डायरेक्टर लिओन यू म्हणाले.

आसूस एक्सपर्ट श्रेणीमध्ये एक्स्पर्ट बुक श्रेणीतील 6 लॅपटॉप्स म्हणजे फ्लॅगशिप एक्सपर्ट बुक बी9, एक्सपर्टबुक पी2, आसूस प्रो एक्सपर्टबुक पी1 मालिका (पी 1440 एफए, पी 1410 सीजेए, पी 1545 एफए आणि पी 1510 सीजेए) यांचा समावेश आहे. आसूस प्रो एक्स्पर्टसेंटरमध्ये एक्स्पर्ट सेंटर डी3, एक्सपर्ट सेंटर डी6 आणि एक्सपर्ट सेंटर डी8 या 3 डेस्कटॉप्सचा समावेश आहे. तसेच ऑलइनवन मालिकेत व्ही222एफए आणि व्ही241एफए पीसी दाखल केले आहेत.

प्रोफेशन स्टँडर्ड आणि बिझनेस करणा-या उद्योगांना डोळ्यापुढे ठेऊन कमर्शियल पीसीची आसूस एक्स्पर्ट सिरीज तयार करण्यात आली आहे. वेगाने वाढणारा व्यवसाय संगणक क्षेत्रातील गरजांसाठी आव्हानात्मक आहे. यामुळे याची मागणी वाढत आहे. याचमुळे आसूस एक्स्पर्ट सिरीज वाणिज्यिक उत्पादनांची गुणवत्ता, विश्वसनीयता आणि लवचिकतेला ध्यानात घेत बनवण्यात आली आहे. ज्यायोगे उद्योजक व व्यापा-यांना याचा संगणक क्षेत्रातील गुंतवणूकीचा फायदा होईल व ते येणा-या संकटांचा सामना करू शकतील.