मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जियो लवकरच मोठा करार करण्याच्या तयारीत

  • दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियो आणि जियोमध्ये करारासाठी बोलणी सुरू

नवी दिल्ली (New Delhi): मोदी सरकारने (modi Government) काही दिवसांपूर्वीच पबजीसह (PUBG) ११८ ॲप्सवर बंदी (apps ban) घातली. देशात पबजी खेळणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या बंदीमुळे पबजी खेळणाऱ्या अनेकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र आता पबजीवरील बंदी हटण्याची शक्यता आहे. पबजी हे दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियोचं (Blue Hole Studio) उत्पादन आहे. मात्र या गेमची फ्रेंचायजी चिनी कंपनी टेन्सेंटकडे (Tencent) होती. ब्ल्यू होल स्टुडियोनं टेन्सेंटकडे असणारी फ्रेंचायजी (Franchise) काढून घेतली आहे. आता हा गेम पूर्णपणे दक्षिण कोरियन (south korean) झाला आहे. त्यामुळेच पबजीवरील बंदी हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Mukesh Ambani) रिलायन्स जियोला डिस्ट्रिब्युशनचं काम मिळणार?

ब्ल्यू होल स्टुडियोच्या एका ब्लॉगपोस्टमधून कंपनीची जियोसोबत बोलणी सुरू असल्याचं समोर आलं आहे. ब्ल्यू होल स्टुडिओ कंपनी जियोला डिस्ट्रिब्युशनचं काम देऊ शकते. याबद्दलच्या करारासाठी सध्या प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय येण्यास काही दिवसांचा अवधी लागेल.

चिनी ॲप्सवर मोदी सरकारची बंदी (Apps Ban)

पबजीसह ११८ चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ॲप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांसोबतच देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं सरकारनं ॲप्स बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितलं. बंदी घालण्यात आलेल्या ११८ ॲप्समध्ये काही लोकप्रिय ॲप्सचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकप्रिय झालेल्या ल्युडो, कॅरम या ऍप्सवरही सरकारनं बंदी घातली.

टिकटॉकही बंदीची कारवाई (tiktok)

पबजीसह ११८ ॲप्सवर बंदीची कारवाई करण्याआधी मोदी सरकारनं ५९ चिनी ॲप्सवर बंदीचा निर्णय घेतला होता. या ५९ ॲप्समध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप टिकटॉकचाही समावेश होता. गेल्या पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सरकारनं चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.