banned chinese apps back on play store in india
प्ले स्टोरवर वाढते आहे ॲप्सची संख्या, यामागे आहे हे कारण?

गेल्या काही दिवसांत प्ले स्टोअरवर (play store) चायनीज ॲप्सची (Chinese Apps) संख्या वाढताना दिसत असून भारतातील (India) कोट्यवधी लोकांनी ती डाऊनलोड (download) केल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तक चायनीज मोबाईल ॲप्सवर बंदी (Banned Chinese Apps) घालण्याचा निर्णय घेतला होता. आता हीच ॲप्स नव्या रूपात युजर्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न चायनीज कंपन्यांनी (Chinese Companies) सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत प्ले स्टोअरवर (play store) चायनीज ॲप्सची (Chinese Apps) संख्या वाढताना दिसत असून भारतातील (India) कोट्यवधी लोकांनी ती डाऊनलोड (download) केल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्य़ा आणि युजर्सची माहिती परस्पर अन्य कंपन्यांना देण्याच्या कारणावरून केंद्र सरकारने सुरुवातीला टिकटॉकसहित 59 ॲप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 47 आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 118 चायनीज ॲप्सवर हिंदुस्थानात बंदी घातली आहे. बंदी घातलेली हीच ॲप्स आता नाव आणि डिझाईनमध्ये बदल करून प्ले स्टोअरच्या माध्यमातून पुन्हा भारतात आणण्यात आली आहेत.

कुएशू नावाच्या चिनी कंपनीने ‘स्नॅक व्हिडिओ’ नावाचे एक ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये युजर्सना शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप, टिकटॉकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर 10 कोटींहून अधिक वेळा हे ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. अज्ञात लोकांसोबत चॅट रूम तयार करणे आणि गेम खेळण्याची सुविधा असणाऱ्या हॅगो या ॲपला भारतात बंदी आहे. या ॲपच्या जागी आता ‘ओला पार्टी’ नावाचे ॲप आले आहे.