बाइटडान्सने फेटाळला अमेरिकेचा प्रस्ताव, Tik tok ची भागीदारी मायक्रोसॉफ्टला विकणार नाही

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकन (America) लोकांना टिकटॉक tiktok बरोबर व्यवसाय करणे थांबवण्याची मुदत दिली आहे. जेणेकरून टिकटॉक आपली मालकी अमेरिकन कंपनीला विकेल.

चीनची कंपनी बाइटडान्स (bytedance) मायक्रोसॉफ्ट (microsoft) ला टिकटॉक (tik tok)च्या मोबाइल अ‍ॅप (mobile app) च्या मालकी हक्कांची विक्री करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. बाइटडान्सने टिकटॉक खरेदी करणार असल्याची ऑफर नाकारली आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत ऑपरेट करण्यासाठी चिनी मालकीची कंपनी विकण्याची किंवा बंद करण्याची अंतिम मुदत लवकरच संपुष्टात येणार आहे.

वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात राजनैतिक वादाचे केंद्रबिंदू टिकटॉक झाले आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांना टिकटॉकबरोबर व्यवसाय करणे थांबवण्याची मुदत दिली आहे. जेणेकरून टिकटॉक आपली मालकी अमेरिकन कंपनीला विकेल.

डोनाल्ड ट्रम्प यांचा असा दावा आहे की, टिकटॉकचा उपयोग फेडरल कर्मचार्‍यांची लोकेशन शोधणे, ब्लॅकमेलसाठी लोकांवर डोजियर आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा मागोवा घेण्यासाठी चीन करू शकतो. बाइटडान्स या कंपनीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉक चालविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत हिस्सा विकण्यासाठी वेळ दिला आहे.

टिकटॉकच्या मालकीचा संदर्भ देताना मायक्रोसॉफ्टने निवेदनात म्हटले आहे की, बाइटडान्सने टिकटॉकचा हिस्सा अमेरिकेच्या ऑपरेशन मायक्रोसॉफ्टला विकण्यास नकार दिला आहे. “आमचा विश्वास आहे की राष्ट्रीय सुरक्षा हितसंबंधांचे संरक्षण करताना आमचा प्रस्ताव टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी चांगला असेल.” ट्रम्प यांच्या आदेशानंतर मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल हे टिकटॉकची मालकी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, जर टिकटॉकची मालकी आम्हाला मिळाली असती तर सुरक्षितता, गोपनीयता, ऑनलाइन सुरक्षा आणि खंडणी या सर्वोच्च दर्जाची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले असते.

अमेरिकेच्या या कारवाईला आव्हान देत टिकटॉकने दावा दाखल केला आहे की, ट्रम्प यांचे आदेश म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अधिनियमा’चे गैरवापर आहे, कारण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशाला कोणताही धोका नाही. अमेरिकेत टिकटॉक १७.५ कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. टिकटॉकचा वापर जगभरात एक अब्ज लोक करतात. वापरकर्त्यांकडून चीनशी डेटा सामायिक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, परंतु कंपनी या गोष्टीला नकार देत आहे.