कॅमेरा मेकर कंपनी Canon वर सायबर हल्ला, 10GB ची फाइल चोरीला

नवी दिल्ली: स्मार्टवॉच मेकर कंपनी गार्मिन Garmin नंतर जपान ची कॅमेरा मेकर कंपनी Canon पर सायबर हल्ला झाला आहे. यानंतर कंपनीची image.canon क्लाउड स्टोरेज सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सोबतच कंपनीने आपला 10GB डेटा गमावला आहे. अद्याप कंपनीने सायबर हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. नवभारत.कॉम (Navabharat Group) ला उपलब्ध झालेल्या अहवालानुसार कॅनॉनवर मेज रॅनसमवेयर (Maze ransomware) चा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

हा सायबर हल्ला झाल्यानंतर कॅनॉनने image.canon वेबसाइटवर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात नमूद केलं आहे की, ३० जुलैला हल्ला झाला आहे ज्यात 10 जीबी स्टोरेज चोरीला गेले आहे. चोरी झालेला डेटा 16जून पूर्वीचा आहे. पुढील तपास करण्यासाठी कंपनीने तात्पुरती image.canon चे मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेब ब्राउजर सेवा दोन्ही बंद केल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, चोरी झालेल्या इमेज फाइल आजही पाहता येऊ शकतात, पण त्या डाउनलोड किंवा ट्रान्सफर करता येणार नाहीत. जर कोणी इमेज फाइल डाउनलोड किंवा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला एक एरर मेसेज दिसेल.

यापूर्वीही कॉग्निजंट, एलजी, झेरॉक्स सारख्या कंपन्यांही सायबर हल्ल्याला बळी पडल्या आहेत. तर, अलीकडेच फिटनेस आणि स्मार्टवॉच मेकर कंपनी गार्मिन (Garmin) वरही सायबर हल्ला झाला होता, यानंतर कंपनीला लाखो डॉलर्सचे नुकसान झाले होते. या हॅकिंगनंतर जवळपास २० तासांपर्यंत कंपनीचा सर्व्हर डाउन झाला होता आणि स्मार्टवॉचेस काही काळ बंद पडली होती.