BS-VI मॉडेल्ससह घ्या जावा रायडिंगचा संपन्न अनुभव

क्लासिक लेजेंड्स प्रा. लि.च्या वतीने देशभरातील विक्रेत्यांच्या नेटवर्कद्वारे जावा आणि जावा फॉर्टी-टू BS-VI मॉडेलच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे. आता दोन्ही मॉडेल डिस्प्ले, टेस्ट राईड आणि नोंदणीकरिता खालील जावा विक्रेत्यांकडे उपलब्ध असतील.

मुंबई: क्लासिक लेजेंड्स प्रा. लि.च्या वतीने देशभरातील विक्रेत्यांच्या नेटवर्कद्वारे जावा आणि जावा फॉर्टी-टू BS-VI मॉडेलच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे. आता दोन्ही मॉडेल डिस्प्ले, टेस्ट राईड आणि नोंदणीकरिता खालील जावा विक्रेत्यांकडे उपलब्ध असतील.

 जावा आणि जावा फॉर्टी-टू, अशा दोन्ही मॉडेलमध्ये 293सीसी, लिक्विड-कुल्ड, सिंगल सिलेंडर, DOHC इंजिनचा समावेश आहे. दोन्ही बाईकमध्ये आता भारताचे पहिले क्रॉस पोर्ट तंत्रज्ञान समाविष्ट आहे, ज्याच्या साह्याने इंजिनची वॉल्युमेट्रीक इफिशीयन्सी वाढते. ज्यामुळे चार्ज आणि एक्झॉस्ट गॅसचा प्रवाह अधिक चांगला होतो तसेच शक्ती आणि टोर्क आऊटपुट सुधारतो.

 यामध्ये वापरण्यात आलेले इंजिन हे जगातील पहिले सिंगल सिलेंडर इंजिन आहे, ज्यामध्ये क्रॉस पोर्ट कॉन्फिगरेशनचा वापर करण्यात आला आहे. एकसमान शक्ती आणि टोर्कला बीएस 4 कॉन्फीगरेशनची सुविधा लाभल्याने ग्राहकांना सर्वोत्तम राईडिंगचा अनुभव मिळतो. हे तंत्रज्ञान मोटरसायकलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ट्वीन एक्झॉस्ट आयडेंटिटी राखायला मदत करते. समान शक्ती आणि टोर्क संख्या राखत या बाईकमध्ये BS-VI उत्सर्जनाची कठोर मानके वापरली जात आहेत.

 सिंगल सिलेंडर इंजिनवरील जगातील पहिल्या क्रॉस पोर्ट कॉन्फिगरेशन देण्यात आलेल्या जावाची कामगिरी अधिक सातत्यपूर्ण राहावी, रस्त्यांची स्थिती कशीही असल्यास स्वच्छ उत्सर्जन मिळावे म्हणून आतीलबाहेरील चलनवलनाकरिता लॅम्ब्डा सेन्सर मॉनिटर देण्यात आले आहेत. यामधील इंधन व्यवस्थेत देखील सुधारणा करण्यात आली आहे. याच्या इनपुटमध्ये बारीक-सारीक अचूक बदल करण्यात आल्याने त्याचे थ्रोटल अधिक सहजतेने फिरते. 

 सीटवर देखील पुन्हा काम करून नवीन सीट पॅन बसविण्यात आले. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आरामदायक कुशनिंगची सुविधा मिळते. या बाईकच्या सौंदर्याविषयी सांगायचे झाल्यास नवीन क्रोम प्लेटिंग उद्योग मानकापेक्षा अडीच पटीने अधिक सशक्त झाले आहे. दोन्ही जावा मॉडेलमध्ये सर्वोत्तम ब्रेकिंग सिस्टिम (सिंगल तसेच ड्युअल चॅनल)चा समावेश आहे. तसेच कॉन्टिनेन्टलद्वारे स्पर्धात्मक उत्पादनांच्या तुलनेत एबीएस कमी ब्रेकिंग अंतर आणि सर्वोत्तम नियंत्रण प्रदान करते.   

 त्याशिवाय इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की हॉर्नचा आवाज ते अविश्वसनीय गिअर शिफ्ट बाईकच्या रुबाबात चार चांद लावतात.

 या मोटरसायकल सुलभ वित्तीय पर्याय श्रेणीसह उपलब्ध आहेत. ज्यामुळे कमीत-कमी खर्च होतो व ग्राहक दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीत सोयीनुसार ईएमआय भरू शकतात.

 जावा विक्रेत्यांकडून देण्यात येणारे वित्तीय पर्याय:

योजना 1 – पहिल्या 3 ईएमआयमध्ये 50%  सूट

योजना 2 – विशेष ईएमआय प्लान @ रु. 5,555/महिना

योजना 3 – @2 वर्षांकरिता सर्वात कमी रु. 8,000 आणि@ 3 वर्षांकरिता रु. 6000 ईएमआय

100% फंडींग | शून्य डाऊन पेमेंट | कोणत्याही उत्पन्न पुराव्याची आवश्यकता नाही. 

क्लासिक लेजेंड्सने आपल्या विक्री दालनांत व्यापक मानक प्रक्रिया राबवली असून ग्राहक, कर्मचारी आणि भेट द्यायला येणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र तसेच राज्य शासनाची धोरणे आणि उपाययोजनांचा स्वीकार केला आहे. समाजात वावरताना शारीरिक अंतर कसे राखावे, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाविषयीचे प्रोटोकॉल कसे पाळावे याविषयीचे प्रशिक्षण दालनांमध्ये कार्यरत टीमला देण्यात आले आहे.