फ्लिपकार्टचा ‘फ्लिपकार्ट लीप’ स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्राम

फ्लिपकार्ट या संपूर्णत: भारतात विकसित झालेल्या ई-कॉमर्स बाजारपेठेने आज ‘फ्लिपकार्ट लीप’ या कंपनीच्या पहिल्यावहिल्या स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्रामचा शुभारंभ केला.

बंगळुरू :  फ्लिपकार्ट या संपूर्णत: भारतात विकसित झालेल्या ई-कॉमर्स बाजारपेठेने आज ‘फ्लिपकार्ट लीप’ या कंपनीच्या पहिल्यावहिल्या स्टार्टअप ॲक्सलरेटर प्रोग्रामचा शुभारंभ केला. नव्या, उदयोन्मुख स्टार्टअप्सना हेरून त्यांचा विकास घडवून, व्याप्ती वाढवून आणि आव्हानांचा सामना करण्याकरिता तयार करून भारतातील वाढत्या उद्योजकतेच्या पर्यावरणात योगदान देण्यास सुसज्ज बनविण्यासाठी, तसेच ‘स्टार्ट अप इंडिया’ला पाठबळ पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाअंतर्गत आजपासून प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्ट लीपच्या माध्यमातून बी2सी आणि बी2बी स्टार्टअप्सचा शोध घेऊन १६ आठवड्यांच्या व्हर्च्युअल प्रोग्रॅमच्या माध्यमातून त्यांचे सबलीकरण केले जाईल. या प्रोग्रॅमअंतर्गत फ्लिपकार्टचे बिझनेस ऑपरेशन्स, उत्पादन आणि तंत्रज्ञान या विषयांतले वरिष्ठ अधिकारी निवडलेल्या स्टार्टअप्सना मार्गदर्शन करतील आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचा परिचय घडवून देतील. त्याचबरोबर उद्योगातील तज्ज्ञांची मास्टर क्लास सेशन्सही आयोजित करण्यात येतील.

जागतिक दर्जाची, बाजारपेठेसाठी तयार मौलिक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना योग्य सामग्री, मूलभूत रचना, माहिती आणि पर्यावरण पुरवण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे. तंत्रज्ञान आणि फ्लिपकार्टच्या सर्वोत्तम अशा मार्गदर्शकांच्या या उद्योगातील सखोल तज्ज्ञतेच्या बळावर स्टार्टअप्सना अत्यंत चैतन्यशील अशा तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक कसे राहायचे, याची सखोल माहिती आणि शिकवण प्राप्त होईल. फ्लिपकार्ट लीपने उच्च सुप्त गुणवत्ता असलेल्या स्टार्टअप्सच्या निवडीसाठी पाच थीम्स ठरवल्या आहेत. यांत डिझाइन अँड मेक फॉर इंडिया, डिजिटल कॉमर्समधील कल्पकता, रिटेल पर्यावरणाला सबळ करणारे तंत्रज्ञान, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स आणि याचबरोबर संबंधित डीप टेक ॲप्लिकेशन्सचे सक्षमीकरण यांचा समावेश आहे. भारतीय ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञान आणि ग्राहक इंटरनेट अवकाशासाठीच्या सर्वात नावीन्यपूर्ण उत्पादनांचा शोध घेण्यासाठी या थीम्स निवडण्यात आल्या आहेत. या थिमॅटिक क्षेत्रामंध्ये डिजिटायझेशन घडवून तांत्रिक सुधारणा घडवून आणणे यावर भर देतानाच येत्या पाच वर्षांत ई-कॉमर्स क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता असणारी, हे क्षेत्र ढवळून काढणारी उत्पादने निर्माण करणाऱ्या स्टार्टअप्सचा शोध घेण्याचाही या उपक्रमाचा उद्देश आहे.

या शुभारंभप्रसंगी फ्लिपकार्ट ग्रूपचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “फ्लिपकार्टचा, शुभारंभापासून देशातील सर्वात लोकप्रिय स्वदेशी ब्रँड्सपैकी एक बनण्याचा प्रवास म्हणजे भारतात स्टार्टअप पर्यावरणाच्या संदर्भात केवढी सुप्तशक्ती दडलेली आहे, याचे दर्शन घडवणारे एक समर्पक उदाहरणच आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नित्य नवे शोध लागतात आणि ते आधीच्या चौकटी मोडून टाकतात. हे घडवून आणणाऱ्या स्टार्टअप्सना त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच उद्योगाचा व त्याचबरोबर ग्राहकाचाही मौलिक फायदा करून देणाऱ्या उत्पादनांसाठी चालना देण्यात अग्रेसर असण्याची आमची इच्छा आहे. या सुप्त क्षमतेला वाव मिळवून देऊन स्थानिक उद्योजकतेच्या पर्यावरणात नावीन्य, उत्सुकता आणि अपारंपरिकता यांना चालना देणाऱ्या नव्या कल्पनांचे भरणपोषण करण्यासाठी फ्लिपकार्ट लीप ही योजना आखण्यात आली असून ती सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ पुढाकाराला पाठबळही देणार आहे.

फ्लिपकार्टचे चीफ प्रॉडक्ट अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर जय वेणुगोपाल म्हणाले, “भारतातील स्टार्टअप पर्यावरणात अनेक वर्षांत घडून आलेल्या कायापालटामुळे भारत हा अनेक सर्वोत्तम दर्जाच्या स्टार्टअप्सच्या प्रवासाचा यजमान देश बनला आहे. बाजारपेठेत नवनवीन उत्पादने, सेवासुविधा आणण्यासाठी विद्यमान मानकांच्या पलीकडे आणि पुढे जाणाऱ्या उद्योजकांच्या गुणवत्तेचा साठा सतत वाढताच आहे. हे टप्पे स्वत: पार करून आपल्या यशाची कमान उभारलेली कंपनी असल्यामुळे आम्ही आमचे नेटवर्क वापरून सुरुवातीच्या टप्प्यातल्या स्टार्टअप्सना उत्क्रांत होण्यात आणि भविष्यातील यशस्वी ब्रँड बनण्यात मदत करणारा एक कार्यक्रम आखू इच्छितो.”

फ्लिपकार्टचे नरेन राऊला यांच्या नेतृत्वाखालील प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अँड डिप्लॉयमेंट टीमने हा प्रोग्रॅम डिझाइन केला असून ही टीम फ्लिपकार्ट कॉमर्स कंपन्या (फ्लिपकार्ट आणि मिंत्रा) आणि व्यापक पर्यावरणामध्ये नावीन्याचा पाठपुरावा करण्यासाठी जबाबदार आहे.

निव्वळ महानगरी ‘इंडिया’तच नव्हे, तर द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये वसलेल्या ‘भारता’तही नावीन्यपूर्ण कल्पना नेण्यावर भर देणाऱ्या या १६ आठवड्यांच्या प्रोग्रॅमची आखणी झिन्नोव यांच्याबरोबर भागीदारीतून करण्यात आली असून त्यातून स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने, सेवा बाजारपेठेत जाण्यास सक्षम बनवता येतील आणि त्यांना २५००० डॉलरचे भांडवलमुक्त अनुदानही मिळेल. फ्लिपकार्ट लीपसाठी अर्ज करणारे स्टार्टअप भारतात स्थित असावेत आणि त्यांच्याकडे अर्ली ॲडॉप्शन मेट्रिक्ससह कार्यरत प्रारूपही असावे. प्रोग्रॅम पूर्ण झाल्यानंतर फ्लिपकार्ट लीपमधील अंतिम सहभागी त्यांचे यशस्वी मॉडेल डेमो डेच्या दिवशी गुंतवणूकदार, कॉर्पोरेट, या परिसंस्थेतील इतर उद्योजक यांच्यासमोर सादर करू शकतात आणि फ्लिपकार्टकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांचा विचार होऊ शकतो.

भारतात सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे, उद्योगातील अहवालांनुसार तिची १२-१५ टक्क्यांनी वृद्धी होते आहे. या अहवालांनुसार देशात दररोज २-३ टेक स्टार्टअप्स जन्माला येतात. या भरभराटीला पोषक पर्यावरणाने गेल्या काही वर्षांत काही सर्वोत्तम स्टार्टअप्सचा प्रवास सुरू करून दिला आहे. केंद्र आणि राज्य स्तरांवरील सरकारच्या पाठबळामुळे आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहनपर नियामक वातावरणामुळे हे क्षेत्र अतिशय कार्यक्षमतेने आणखी काही अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही.

फ्लिपकार्ट लीपविषयीची अधिक माहिती, तसेच अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.flipkartleap.com/