Google वर तयार करा आपले व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड; लाँच झाली ही विशेष सेवा

गुगलने आपल्या युजर्ससाठी people card सेवा आणली आहे. या सेवेच्या मदतीने युजर गुगल सर्चसाठी आपलं व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड तयार करू शकतात. ही सेवा गुगलने आता फक्त मोबाइल युजर्ससाठीच सुरू केली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

मुंबई : Google आपल्या युजर्सला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी नव-नवीन फीचर आणत असते. यावेळी कंपनीने भारतीय  युजर्ससाठी खास ‘people cards’ ही विशेष सेवा सुरू केली आहे. हे फीचर आल्याने गुगल सर्चमध्ये युजर्सला व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्ड तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हर्चुअल व्हिजिटिंग कार्डद्वारे युजरला गुगल सर्चमध्ये स्वत:ची वेबसाइट, सोशल मीडिया हँडल आणि अन्य माहिती शेअर करता येणार आहे.

गुगल अकाउंट असणं आहे आवश्यक

ही सेवा गुगलच्या Knowledge Graph चा वापर करून ती माहिती डिस्प्ले करते जी युजरने दिलेली आहे. सेवेचा लाभ घेण्यासाठी युजरला आपला मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे. गुगल सर्चवर people card तयार करण्यासाठी युजरचं स्वत:चं गुगल अकाउंट असणं आवश्यक आहे.

मोबाइल युजर्सलाच मिळणार या सेवेचा लाभ

कंपनीने ही विशेष सेवा सध्या फक्त मोबाइल युजर्सलाच ऑफर केली आहे. या अर्थ असा की, आपल्याला आपले पब्लिक प्रोफाइल तयार करण्यासाठी आपल्या मोबाइल डिव्हाइसमधून गुगल अकाउंट लॉग इन करावं लागेल. ही सेवा सध्या फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे.

फेक प्रोफाइल आणि चुकीच्या माहितीवर आली बंदी

या सेवेच्या माध्यमातून गुगल जनतेपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुगलने स्पष्ट केले. ही सेवा सुरू झाल्याने चुकीचा युजर, भाषा आणि लो-क्वॉलिटी कंटेन्ट ओळखण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच कंपनी या सेवेच्या माध्यमातून ह्युमन रिव्ह्यू आणि ऑटोमेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या कंटेन्टलाही आळा घालणार आहे. people card चुकीचा वापर होऊ नये यासाठी कंपनीने एका अकाउंटसाठी एकच people card तयार करण्याची मुभा दिली आहे.

गुगलवर असं तयार करा आपलं people card

आपलं people card तयार करण्यासाठी सर्वप्रथम गुगल अकाउंटमध्ये साइन-इन करा. यानंतर आपल्याला ‘add me to search’ सर्च करावं लागेल. यानंतर आपल्याला ‘add yourself to google search’ चा ऑप्शन मिळेल. या मेसेज वर टॅप करा. टॅप केल्यानंतर गुगल आपल्याला आपला आपला फोन नंबर विचारेल. नंबर 6 अंकांचा कोड वापरून व्हेरीफाय करावा लागेल. जो एंटर केलेल्या मोबाइल नंबरवर येईल. यानंतर गुगल आपल्याला एक फॉर्म देईल. यात आपल्याला पब्लिक प्रोफाइल तयार करण्यासाठी आवश्यक माहिती द्यावी लागेल. येथे आपल्याला आपले काम / व्यवसाय, शिक्षण याशिवाय अन्य डिटेल्स एंटर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.