Google Pixel 4a स्मार्टफोन आज होणार लाँच, मिळणार हे धमाल फीचर

गुगल आज पिक्सल 4a सीरीजचे स्मार्टफोन लाँच करणार आहे. याच्या बेस वेरियंटसोबत एक 5G वेरियंटही लाँच होण्याची शक्यता आहे. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबतच फास्ट चार्जिंग सारखे फीचर असण्याची शक्यता आहे.

मुंबई : Google आज आपला पिक्सल 4a सीरीजचे स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलचा हा फोन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि याबाबत अनेक अफवाही उठल्या होत्या. गुगल पिक्सल 4a कंपनीचा एक स्वस्त स्मार्टफोन असणार असेल अशी चर्चा आहे. हा फोन मे मध्ये होणाऱ्या गुगल I/O इव्हेंटमध्ये लाँच होणार होती, पण गुगलला हा इव्हेंट कोविड -19 महामारीमुळे करता आला नाही.

गुगल पिक्सल 4a कंपनी आज किती वाजता लाँच करणार आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही, पण अमेरिकन वेळेनुसार ३ ऑगस्टच्या सकाळी लाँच होणार हे निश्चत आहे. याचा अर्थ असा की, भारतीय वेळेनुसार गुगल पिक्सल 4a आज संध्याकाळपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

ही असेल किंमत

फोनबाबत काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार गुगल पिक्सल 4aचे 64जीबी वेरियंट कंपनी 299 डॉलर (जवळपास 22,400 रुपये) लाँच करण्याची शक्यता आहे. तर याच्या 128जीबी स्टोरेजच्या वेरियंटची किंमत 26,100 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. फोन कंपनी भारतात लाँच करणार आहे. भारतात याची किंमत काय असेल याबाबत काहीही सांगता येणार नाही.

पिक्सल 4a मध्ये हे असतील फीचर आणि स्पेसिफिकेशन्स

>> स्टॉक अँड्रॉइड 10 ओएस प्रणालीवर आधारित

>> पंच-होल डिझाइनसह

>> 1080×2340 पिक्सल रिझोल्युशनचा 5.8 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले

>> फोन 6जीबी रॅम के सह 64जीबी आणि 128जीबीचे स्टोरेज वेरियंट

>> ॲड्रिनो 618 जीपीयुसोबत स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर 

>> फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमरा

>> सेल्फीसाठी पिक्सल 4a मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा

>> 3,080mAhची बॅटरी 18 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट

>> कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-C पोर्ट

>> जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ओटीजी फीचर्स