Independence Day 2020: WhatsApp वर हे स्टिकर वापरा अन् द्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर आपण आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सॲप स्टिकर्स पाठविणार असाल तर आता हे खूपच सोपं होणार आहे. हे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे आणि कसे पाठवायचे जाणून घेऊया.

मुंबई : आज देशात ७४ वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2020) साजरा होत आहे. या निमित्त अनेकजण इंस्टंट मेसेजिंग ॲप  WhatsApp च्या माध्यमातून  संदेश पाठवत असतात. व्हॉट्सॲपचा वापर करून  आपण स्वातंत्र्य दिनाशी संबंधित मेसेज व्यतिरिक्त, स्टिकर्स आणि GIF ही पाठवू शकता.

असे इंपोर्ट करा इंडिपेंडन्स डे स्टिकर पॅक

सर्वप्रथम व्हॉट्सॲप ओपन करा आणि कोणत्याही चॅटमध्ये जाऊन Stickers सेक्शनमध्ये जा.

यासाठी आपल्याला चॅटच्या खाली दिलेल्या इमोजी आयकॉनवर जाऊन उजवीकडील स्टिकर्स आयकॉनवर टॅप करा.

आता प्लस (+) ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल, येथे आपल्याला दोन पर्याय All Stickers आणि My Stickers दिसतील.

आता All Stickers पर्यायात सर्वात खाली दिलेल्या Get More Stickers ऑप्शनवर टॅप करा.

असे केल्याने आपण थेट गुगल प्ले स्टोरवर जाल.

येथे आपल्याला Independence Day stickers सर्च करावे लागतील. यात एक लिस्ट ओपन होईल.

लिस्टमध्ये दिलेले कोणतेही स्टिकर ॲप डाउनलोड करा.

उदाहरणादाखल आम्ही 15 August Independence Day Sticker 2020 ॲप डाउडलोड केलं, याला 4.4 स्टार रेटिंग मिळालं आहे.

डाउनलोड केलेले स्टिकर ॲप ओपन करा आणि Add to whatsapp ऑप्शनवर टॅप करा.

असे केल्याने स्टिकर्स आपल्याला My Stickers पर्यायात दिसतील.

आता व्हॉट्सॲप ओपन करा आणि ज्यांना आपल्याला स्टिकर्स पाठवायचे आहेत ते चॅट ओपन करा.

आता खाली दिलेले इमोजी ऑप्शनवर टॅप करा, त्यानंतर खाली दिलेल्या तिसऱ्या (Stickers) पर्यायवर टॅप करा.

नवीन स्टिकर्स या ठिकाणी आपल्याला दिसू लागतील. येथून आपल्याला ते इतरांना पाठविता येतील.