भारतात Mi Browser Pro बॅन, शाओमी युजर्सवर होणार परिणाम

भारतीय नागरिकांच्या डेटाची सुरक्षा आणि प्रायव्हसी लक्षात घेता जूनच्या अखेरच्या आठवड्यात सरकारने 59 चायनीज ॲप्स बॅन केले आहेत. पुन्हा एकदा सरकारने ४७ चायनीज ॲप्स बॅन केले असून नव्या यादीत शाओमीच्या Mi Browser Pro ॲपचाही समावेश आहे. याचा थेट परिणाम जे या ॲपमधून ब्राउझिंग करतात, त्या शाओमीच्या युजर्सवर होणार आहे.

मुंबई : जून महिन्याच्या अखेरीस भारत सरकारतर्फे 59 चायनीज ॲप्स बॅन करण्यात आले असून यात खूप साऱ्या लोकप्रिय ॲप्सचाही समावेश होता. पुन्हा एकदा 47 चायनीज ॲप्स बॅन होणार असल्याचे सांगण्यात आले असून यात अनेक बॅन केलेल्या ॲप्सच्या लाइट व्हर्जनचाही समावेश आहे. या 47 ॲप्सच्या लिस्टमध्ये शाओमीच्या Mi Brower Pro चाही समावेश आहे.

जेव्हा भारत सरकारच्या वतीने शाओमीचे एखादे ॲप बॅन केले आहे असं पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी बॅन केलेल्या 59 ॲप्सच्या यादीतही Mi कम्युनिटी ॲप आणि Mi Video ॲपचाही समावेश होता. ही दोन्ही ॲप्स आता भारतात ॲक्सेस करता येणार नाहीत. आता Mi Brower ॲपचाही यात समावेश झाला आहे आणि हे गुगल प्ले स्टोर सोबतच ॲपल ॲप स्टोरमधूनही हटविण्यात आले आहे.

फोनमध्ये प्री-इंस्टॉल आहे ॲप

Mi Browser Pro App असेच युजर्स वापरत आहेत ज्यांच्या फोनमध्ये ते आधीपासून इंस्टॉल आहे. येत्या काही दिवसांत अन्य चायनीज ॲप्सप्रमाणेच हे ॲपही ब्लॉक करण्यात येण्याची शक्यता आहे. सर्व शाओमी डिव्हाइसेजमध्ये Mi Brower प्री-इंस्टॉल असतं आणि यात पोको, रेडमी आणि Mi डिव्हाइसेजचा समावेश आहे. जर हे ॲप ब्लॉक करण्यात आलं तर युजर्स फोनमध्ये ॲप असूनही त्याचा वापर करू शकणार नाहीत.

शाओमी युजर्सनी चिंता करण्याचं कारण नाही

शाओमी भारतीय कायद्यानुसार नेहमीच डेटा गोपनीयता आणि सुरक्षेशी संबंधित गरजा आणि मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत आली आसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यापुढेही शाओमी भारत सरकारच्या संबंधित सूचनांचे पालन करेल आणि यात कशाप्रकारे बदल करता येतील याबाबत चर्चा करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. शाओमी फोन युजर्सला चिंता करण्याचे काहीही कारण नाही असेही कंपनीने नमूद केले आहे.

या ॲप्सचा करा वापर

जर तुमच्याकडे शाओमी किंवा पोकोचा कोणताही फोन असेल तर गुगल क्रोम सारख्या मोबाइल ब्राउझरचा वापर तुम्ही करू शकता. Mi Browser ऐवजी युजर्स क्रोम व्यतिरिक्त  Mozilla Firefox आणि Microsoft Edgeचाही वापर आपल्या डिव्हाइसेजमध्ये करू शकता.