instagram10 new features cross platform message support
इंस्टाग्रामचे १० नवीन फिचर्स; मॅसेंजरवरुन इंस्टा युजर्सलाही करता येणार मेसेज

आता मॅसेंजरहून इंस्टा युजर्सला किंवा इंस्टावरुन मेसेंजरवरील युजर्सला मेसेज करणं किंवा फोन करणं शक्य झालं आहे. यासारखी १० नवीन फिचर्स इंस्टाग्रामवर आली आहेत. पाहू या कोणती आहेत ही फिचर्स…

मागील काही दिवसांपासून फेसबुक कंपनी (facebook company) इन्स्टाग्राम (instagram) आणि मेसेंजर (messanger) यांच्यात क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेजिंगसाठी (cross platform messaging) प्रयत्न करत आहे. फेसबुकने नुकताच याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये फेसबुकला यशही मिळाले आहे. फेसबुकने नुकतेच क्रॉस ॲप मॅसेजिंग (cross app messaging) आणि कॉलिंग फीचर (calling feature) लाँच केलं आहे. म्हणजे आता मॅसेंजरहून इंस्टा युजर्सला किंवा इंस्टावरुन मेसेंजरवरील युजर्सला मेसेज करणं किंवा फोन करणं शक्य झालं आहे. यासारखी १० नवीन फिचर्स (10 new features) इंस्टाग्रामवर आली आहेत. पाहू या कोणती आहेत ही फिचर्स…

क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेज

या फिचर्सनुसार आता मॅसेंजरहून इंस्टा यूजर्सला मेसेज पाठवू शकतो किंवा फोनही करु शकतो. दोन्हीकडे तेच कॉन्टॅक्ट असेल तरच हे फिचर वापरता येतं.

वॉच टुगेदर फीचर

या फिचरनुसार Facebook वर एकत्र व्हिडिओ पाहू शकतो. हे व्हिडिओ Facebook वॉच, IGTV, Reels चे असतील.

वॅनिश मोड

या फिचरमुळे तुम्ही पाठवलेले मेसेज समोरील व्यक्तीने वाचल्यानंतर चॅट विंडोतून बाहेर आल्यावर मेसेज डिलिट होणार.

सेल्फी स्टिकर्स

सेल्फी क्लिक केल्यानंतर याला बूमरँग स्टिकर्स करु शकतो .

कस्टम इमोजी रिएक्शन्स

यामध्ये फेवरेट ईमोजीचा शॉर्टकट तयार करु शकतो.

मेसेज कंट्रोल्स

या फिचर्सचा वापर करुन आपल्याला कोण मेसज करु शकतो हे ठरवू शकतो… अनावश्यक मेसेज टाळण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.

इनहँसमेंट रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग अप्डेट्स

आता संपूर्ण संभाषणालाही रिपोर्ट करु शकतो. पहिल्यांदा फक्त एखाद्या मेसेजला रिपोर्ट करता येत होतं.

चॅट कलर्स
फॉरवर्डिंग
रिप्लाईज
एनिमिटेड मेसेज इफेक्ट्स