या फोनचा जगभरात डंका, ठरला सर्वाधिक लोकप्रिय फोन

या फोनमध्ये अनेक ढासू फीचर्स आहेत. फोनमध्ये 6.1 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये सिक्स कोर A13 बायॉनिक 64bit प्रोसेसर, 8 कोर न्यूरल इंजन या गोष्टींचा समावेश आहे.

मुंबई : Apple ने 2020 च्या दुसऱ्या तिमाहीच्या सेल्स अहवालात दावा केला आहे की, चीनमध्ये iPhone 11 बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरला आहे. Counterpoint  संशोधनातील लेटेस्ट अहवालातही ही बाब स्पष्ट झाली आहे की, आयफोन 11 चीनच्या बाजारात बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे. अहवालानुसार चीनमध्ये  iPhone 11, Oppo A8, Honor 9X, Vivo Y3 आणि Huawei Mate 30 5G ची सर्वाधिक विक्री झाली आहे. यात आईफोन 11 आणि हुवावे मेट 30 5G प्रिमियम सेगमेंटचे फोन आहेत तर अन्य फोन बजेट सेगमेंटचे फोन आहेत.

या देशांतील मार्केटमध्येही आईफोन 11 चाच धुमाकूळ

चीन व्यतिरिक्त अमेरिका, जर्मनी, युके आणि जपान मध्ये आयफोन 11 ची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. युकेत टॉप 5 मध्ये विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये 4 आयफोनचा समावेश आहे. जपानमध्येही आयफोन 11 टॉप 3 बेस्ट सेलिंग फोनमध्ये अव्वल स्थानी आहे.

सध्या आयफोन 11 हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय फोन आहे

Omdia संशोधन कंपनीने आपल्या अहवालात दावा केला आहे की, आयफोन 11 आजमितीला जगातील सर्वाधिक लोकप्रिय फोन आहे. कोरोना महामारीच्या उद्रेकातही कंपनीने या फोनची 19.5 मिलियन युनिट्स वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्री केली आहेत.

ॲपल आयफोन 11मध्ये अनेक ढासू फीचर्स आहेत. फोनमध्ये 6.1 इंच LCD डिस्प्ले दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये सिक्स कोर A13 बायॉनिक 64bit प्रोसेसर, 8 कोर न्यूरल इंजन या गोष्टींचा समावेश आहे. फोनमध्ये 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेजचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. फोन iOS 13 प्रोसेसर आहे. फोन ड्युअल सिम सेटअपसह येतो.