iPhone 12 सीरीझसोबत मिळणार नाहीत इयरफोन्स आणि चार्जर, किंमतही असेल जास्त

iPhone 12 सीरीझसोबत चार्जर आणि इयरफोन्स मिळणार नाहीत. याशिवाय ही आजवरची सर्वात महागडी iPhone सीरिझ असण्याची शक्यता आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आयफोन १२ सीरिझच्या किंमतीबाबत माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊया अधिक माहिती.

मुंबई : Apple iPhone 12 सीरिझची लाँचिंग तारीख जवळ येत आहे. याच दरम्यान या सीरिझशी संबंधित अफवा आणि बातम्या खूपच ऐकण्यात येत आहेत. ट्रेंडफोर्सच्या एका नव्या अहवालानुसार कंपनी आपली 2020 लाइनअप ॲक्सेसरिज शिवाय लाँच करणार आहे आणि या सीरिझचे डिव्हाइसही उपलब्ध असलेल्या iPhone 11 सीरिझपेक्षा महाग असणार आहेत.

२० वॅटचा चार्जर वेगळा खरेदी करावा लागणार

अहवालानुसार ॲपल आयफोन 12 सीरिझचे स्मार्टफोन्सच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. एवढेच नाही, तर नवीन आयफोन वायर्ड इयरपॉडशिवाय येतील असं सांगण्यात येत आहे. आयफोन 12 सीरिझ ॲक्सेसरिझ शिवाय येणार असल्याची बाब अन्य अहवालातूनही यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. या अहवालात हेही नमूद केलं आहे की, कंपनी आयफोन 12 सीरिझसाठी वेगळा २० वॅटचा चार्जर ऑफर करणार आहे.

प्रारंभिक किंमत 699 डॉलर असण्याची शक्यता

ट्रेंडफोर्स ने आपल्या अहवालात आयफोन 12 सीरिझ अंतर्गत येणाऱ्या डिव्हाइसेजच्या किंमतीचा उल्लेखही केला आहे. अहवालानुसार iPhone 12 ची किंमत 699 डॉलरपासून ते 749 डॉलर दरम्यान असण्याची शक्यता आहे. iPhone 12 Max ला कंपनी 799 डॉलर किंवा 849 डॉलरच्या प्रारंभिक किंमतीला सादर करण्याची शक्यता आहे. iPhone 12 Pro बाबत सांगायचं झालं तर याची किंमत 1,049 डॉलरपासून ते 1,099 डॉलर दरम्यान सुरू होणार आहे. सीरिझचा सर्वात प्रिमियम डिव्हाइस iPhone 12 Pro Max असणार आहे. याची किंमत 1,149 रुपयांपासून ते 1,199 रुपयांदरम्यान सुरू होणार आहे.

आजवरची सर्वात महागडी iPhone सीरिझ

ट्रेंडफोर्सच्या अहवालात नमूद केलेली किंमत जर बरोबर असेल तर आयफोन 12 सीरिझ कंपनीची सर्वात महागडी आयफोन सीरिझ असणार आहे. तसं पाहता आयफोन 12 सीरिझ महाग असणार हे पूर्वीपासूनच गृहित धरलं होतं कारण यात 5G कनेक्टिविटी सोबतच आणखी काही खास फीचर्स पहायला मिळणार आहेत. पण आयफोन 12 सीरिझच्या किंमती कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत असंही ॲपलने म्हटलं आहे.