iPhone buyers will get a discount of up to Rs 63,000, find out Apple's trade-in scheme

ॲपलच्या संकेतस्थळानुसार ट्रेड-ईन ऑफरमध्ये आपण आपला जुना मोबाईल फोन देऊनही सूट मिळवू शकता. कंपनीने याबाबत सविस्तर माहिती आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

आयफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. Apple कंपनीने आपल्या सगळ्यात महागड्या आयफोन 12 (iPhone 12 ) वर मोठी सूट (BIg Discount) देण्याची घोषणा केली आहे. Apple ने यासाठी ट्रेड ईन ऑफर (trade-in Offer) आणली आहे. या ट्रेड ईन ऑफरमध्ये तुम्ही सर्वात महागडा आयफोन 12 हा 34 हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदी करु शकता. याचबरोबर आयफोनच्या iPhone 11 Pro Max या मोबाईल फोनवर सुमारे 63 हजार रुपयांची सूटही मिळवू शकता. ॲपलच्या ट्रेड ईन वर आयफोनच्या सर्व फोनवर सूट देण्यात आली आहे.

ॲपलच्या संकेतस्थळानुसार ट्रेड-ईन ऑफरमध्ये आपण आपला जुना मोबाईल फोन देऊनही सूट मिळवू शकता. कंपनीने याबाबत सविस्तर माहिती आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही apple.com/in/shop/trade-in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या ऑफरमध्ये तुम्ही आयफोन कोणत्याही कंपनीच्या मोबाईल फोन्सच्या बदल्यात घेऊ शकता. तसेच या ऑफरमध्ये फोन खरेदी करायचा असेल. तर तुम्हाला जुन्हा स्मार्टफोनच्या आयएमईआय कोड आणि स्टेरेजबाबत माहिती देणे अनिवार्य आहे. ही माहिती दिल्यानंतरच आयफोनच्या मोबाईलवर किती सुट मिळेल याबाबत apple माहिती देल.