Jio Fiber ने ग्राहकांसाठी आणला सर्वात स्वस्त अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लान, 30-दिवसांची फ्री ट्रायल ऑफर

मुंबई : JioFiber ने नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी आपला टेरिफ प्लान नव्या रुपात सादर केला आहे. रिलायन्स जिओने असे नमूद केले आहे की या नवीन शुल्क योजना या आव्हानात्मक काळात खूप फायद्याच्या ठरतात, जेव्हा विश्वसनीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक निकष मानला जातो.

नवीन JioFiber चा काय आहे प्लान

अनलिमिटेड इंटरनेट सुविधा

हाय स्पीड इंटरनेट

फक्त 399 रुपए प्रति महिन्यापासून सुरू होणारा प्लान

कोणतेही अतिरिक्त चार्जेस आकारले जाणार नाहीत.

टॉप 12 पेड OTT ॲप्सची मेंबरशिप मिळणार.

याबाबत माहिती देताना, जिओचे संचालक, आकाश अंबानी म्हणाले, “JioFiber पूर्वीपासूनच एक लाखांहून अधिक घरांशी जोडले गेल्यानंतर देशातील सर्वात मोठा फायबर सेवा पुरवठादार ठरला आहे, पण भारत आणि भारतीयांसाठी आम्ही नेहमीच दूरदृष्टीने विचार करतो. आम्ही भारतातील प्रत्येक घरात फायबर सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला इंटरनेटचा भक्कम आधार मिळणार आहे. Jio सोबतच मोबाइल कनेक्टिविटीमध्ये भारताला सर्वात मोठा आणि वेगाने पुढे जाणारा देश म्हणून नावाजला गेल्यानंतर, JioFiber भारताला जागतिक ब्रॉडबँड नेतृत्वात पुढे नेण्यास मदत करेल, ज्यामुळे 1,600 अधिक शहरांत आणि गावा-गावांत ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे. मी सर्वाना आवाहन करतो की, भारताला जगातील ब्रॉडबँडचे नेतृत्व करण्यासाठी JioFiber आंदोलनात सामिल व्हा.

JioFiber नो-कंडीशन 30- दिवसांची फ्री ट्रायल

ग्राहक 30 दिवसांसाठी ही सेवा ट्राय करू शकतात.

150 एमबीपीएस ट्रूली अनलिमिटेड इंटरनेट सेवा

कोणत्याही किंमतीशिवाय शीर्ष 10 पेड ओटीटी अ‍ॅप्सवर असलेला 4 के सेट-टॉप बॉक्स

फ्री व्हॉइस कॉलिंग

30-दिवसांचे नि: शुल्क परीक्षण सर्व नवीन ग्राहकांना लागू आहेत, जर सेवा चांगली वाटत नसेल याचे कोणतेही चार्जेस आकारण्यात येणार नाहीत.

JioFiber आपल्या ग्राहकांना काय देणार

हाय-स्पीड इंटरनेट: घरात पूर्णपणे विश्वसनीय इंटरनेट आणि वायफाय ज्यामुले घरातील प्रत्येक सदस्याला शिक्षण, काम, आरोग्य आणि खरेदीचा लाभ घरबसल्या घेता येणार

मनोरंजन: मनोरंजनाचा अनुभव ऑन-डिमांड व्हिडियो, लाइव टीव्ही, मूव्हीज यामुळे वातावरण बदलते. कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय

नेटफ्लिक्स, अमेझॉन, डिज्नी + हॉटस्टार यांसारखे12 पेड ओटीटी ॲप यांचा समावेश JioTV प्लस मिळणार

साधनांचा शोध घेण्यास सुलभता: Jio Remote वर व्हॉईस सर्चच्या माध्यमातून कंटेटची सर्वात मोठी लायब्ररीचा शोध घेणं

सोपं होणार मोफत एचडी व्हॉइस कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉल

Jio Meet सोबत मिळणार घरून काम करण्याची सुविधा

Jio Meet ॲपसोबत घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण

Jio Games एक सुखद गेमिंग अनुभवासाठी मजेशीर गेमिंगचा पर्याय

1 सप्टेंबर पासून सक्रिय होणाऱ्या नवीन JioFiber च्या ग्राहकांना 30-दिवसांसाठी मोफत ट्रायल घेता येणार, आता असलेल्या JioFiber युजर्सला खाली दिलेल्या निर्देशानुसार विशेष लाभ मिळेल.

आता JioFiber असलेल्या ग्राहकांना नवीन टॅरिफ योजनांचा लाभ घेता यावा यासाठी योजना अपग्रेड करणार

15 ते 31 ऑगस्ट दरम्यान आलेल्या नवीन JioFiber ग्राहकांना MyJio मध्ये वाउचरच्या स्वरुपात 30 दिवसांसाठी मोफत परीक्षणाचा लाभ मिळणार