Jio Phone 5 वर काम सुरू, ५०० रुपयांहून कमी किंमतीत लाँचची शक्यता

जिओने अलीकडेच ४जी स्मार्टफोन आणण्याबाबत खुलासा केला होता. आता एका रिपोर्टमध्ये जिओ फोनच्या नव्या वेरियंटवर काम सुरू असल्याचे समोर आले आहे. Jio Phone 5 मध्ये ४जी एलटीई कॉलिंग फीचर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई : रिलायन्स जिओने १ हजार रुपयांहून कमी किंमतीत एलटीई फोन लाँच करून फोन जगतात धमाल उडवून दिली होती. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात जिओने यानंतर जिओ फोन २ अपग्रेडेट वेरियंट म्हणून लाँच केला. जिओ फोन २ लाँच झाल्यानंतरही सर्वात आधी लाँच झालेला जिओ फोनची आजही विक्री सुरूच आहे. हा जिओ फोन ६९९ रुपयांना मिळतो आहे. आता रिलायन्स जिओ एक स्वस्त हँडसेट मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. जिओचा स्वस्त फोन म्हणून लवकरच JioPhone 5 लाँच होण्याची शक्यता आहे.

91Mobiles च्या एका रिपोर्टनुसार जिओ फोन ५वर काम सुरू आहे. नवीन जिओ फोनही आता एक फीचर फोनच असणार आहे. जिओ फोन ५ ओरिजनल जिओ फोनचं एक लाइट व्हर्जन असणार असल्याचं वृत्त आहे म्हणजेच हा फोन जिओ फोनच्या उपलब्ध किंमतीपेक्षा कमी किंमतीला विकत घेता येणार आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार जिओ फोन५ ३९९ रुपये किंमतीला लाँच होण्याची शक्यता आहे. अर्थातच हा फोन बाजारात येणारा सर्वात स्वस्त फोन ठरणार आहे. जिओचा आजवरचा रेकॉर्ड पाहता येणाऱ्या फीचर फोनमध्ये ४जी एलटीई कनेक्टिविटी असण्याची आशा आहे.

किंमत कमी ठेवण्यासाठी फोनच्या हार्डवेअरमध्ये बदल असणार आहे. फोनमध्ये ओरिजनल जिओ फोनप्रमाणेच छोटा एलसीडी डिस्प्ले आणि किपॅड देण्यात येणार आहे. एका वृत्तानुसार, जिओ फोन लाइट मध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी देण्यात येणार नाही असा अंदाज आहे. याशिवाय किंमत कमी ठेवण्यासाठी यात कॅमेराही नसेल असं सांगितलं जात आहे. लिमिटेड स्टोरेज असल्याने नवे ॲप्सही फोनमध्ये डाउनलोड करता येणार नाहीत.

JioPhone 5 ची लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. जिओ या वर्षी किंवा पुढल्या वर्षी येणाऱ्या जिओ स्मार्टफोनसोबतच नवीन जिओ फोन वेरियंट लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी टचस्क्रीन आणि अँड्रॉइड ओएससोबत वाजवी दरात ४जी फोन आणण्याच्या तयारीत असल्याची घोषणा जिओने केली आहे.

JioPhone 5: संभाव्य फीचर्स

>> ४जी एलटीई

>> KaiOS प्लॅटफॉर्म

>> इंटरनेट ब्राउजरसह काही ॲप्स इंस्टॉल असतील

>> वॉट्सॲप, गुगल, फेसबुक सारखे ॲप्स प्री-लोडेड

>> जिओ फोन ५ वरून जिओच्या सर्व नंबरवर मोफत कॉल करण्याची सुविधा

>> इंटरनेट वापरासाठी वेगवेगळ्या प्लानचे रिचार्ज करावे लागणार

>> आता उपलब्ध प्लानपैकी जिओ फोन ५ किंवा

>> JioPhone Lite यूजर्ससाठी सादर करणार

>> या फोनसाठी काही वाजवी दरातील प्लानही लाँच करण्याची शक्यता