Joker Virus : अकाउंट होईल रिकामं, तातडीने Delete करा सहा धोकादायक Apps

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन सहा धोकादायक मोबाइल अ‍ॅप्स हटवले आहेत. हटवलेले सर्व अ‍ॅप्स ‘मॅलवेअर जोकर’ या व्हायरसने इन्फेक्टेड होते. युजर्सनाही हे अ‍ॅप्स तातडीने डिलिट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हटवण्यात आलेले सहा धोकादायक अ‍ॅप्स सायबर सिक्‍युरिटी फर्म Pradeo च्या अभ्यासकांनी शोधले. ‘मॅलवेअर जोकर’ने इन्फेक्टेड हे अ‍ॅप्स 2 लाखांपेक्षा जास्त वेळेस डाउनलोड झाले आहेत. गुगलने हे अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवले असले तरी जे युजर्स यांचा वापर करत होते त्यांच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅप्स अजूनही आहेत. फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप्स डिलिट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जोकर मॅलवेअर हटवलेल्या सर्व अ‍ॅप्समध्ये नव्या रुपात होता. हॅकर्स या अ‍ॅप्सद्वारे युजर्सच्या परवानगीशिवाय त्याला प्रीमियम सर्व्हिससाठी सबस्क्राइब करायचे. हॅकर्सकडे युजरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस जातो, त्यामुळे युजरच्या नकळत बिलिंगसाठी किंवा अन्य बाबींसाठी युजरच्या अकाउंटचा वापर केला जातो. 2017 पासून गुगलने ‘मॅलवेअर जोकर’ने इन्फेक्टेड असलेले 1700 अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. पण दरवेळेस नव्या रुपात हा व्हायरस प्ले स्टोअरवर येत असतो.

जाणून घेऊया कोणते आहेत हटवलेले धोकादायक Apps :

१) Convenient Scanner 2

२) Safety AppLock

३) Push Message-Texting & SMS

४) Emoji Wallpaper

५) Separate Doc Scanner

६) Fingertip GameBox