649cc इंजनने सुसज्ज Kawasaki Vulcan S BS6 भारतात लाँच

नवी दिल्ली : कावासाकी (Kawasaki) ने आपली बाइक Kawasaki Vulcan S BS6 भारतात लाँच केली आहे. याची खासियत अशी की, हिचा लूक खूपच शानदार आहे, जो ग्राहकांना तिच्याकडे आकर्षित करण्यास भाग पाडतो. सोबतच या बाइकमध्ये 649cc चं पावरफुल इंजिन आहे. या नवीन बाइकची किंमत मागील BS4 मॉडेलच्या तुलनेत 30,000 रुपयांनी अधिक आहे. यात BS6 इंजिन व्यतिरिक्त नवीन मॅटेलिक फ्लॅट रॉ ग्रोस्टोन कलरही दिला आहे.

इंजिन आणि पावर

या बाइकमध्ये 649 सीसीचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 60 बीएसपीची पावर आणि 63 Nm चा टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड गियरबॉक्स दिला आहे. यात 14 लीटरची फ्यूल टँक आहे. या बाइकच्या सीटची उंची 705mm आहे. या बाइकमध्ये वेगवेगळे सीट ऑप्शनही मिळणार आहेत. बाइकचे वजन 235 kg आहे.

या बाइकमध्ये Ergofit सिस्टिम दिली आहे. याच्या माध्यमातून रायडर हँडलबार आणि फुटपेग आपल्या हिशेबाने अॅडजस्ट करू शकतो. बाइकमध्ये पुढल्या बाजूला 41mm चे टेलिस्कोपिक सस्पेंशन दिले आहे. या बाइकच्या दोन्ही टायर्समध्ये डिस्कब्रेक दिले आहेत.

किंमत

कंपनीने या बाइकची किंमत 5.79 लाख ₹ ठेवली आहे. ही बाइक सिंगल कलर वेरियंट मॅटेलिक फ्लॅट रॉ ग्रोस्टोनमध्ये उपलब्ध होईल. कंपनीने बाइकच्या फीचर्समध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. कंपनीने या बाइकची बुकिंग आधीपासूनच सुरू केली आहे.