Kia Sonet SUV त मिळणार हे 5 धमाल फीचर्स

Kia Sonet ची मार्केटमध्ये थेट टक्कर मारुती ब्रेजा, हुंदाई वेन्यू आणि टाटा नेक्सॉन सारख्या एसयूव्हीसोबत असणार आहे. किआ मोटर्सने आपल्या या छोट्या एसयुव्हीमध्ये काही असे फीचर्स (सेगमेंट-फर्स्ट फीचर्स) दिले आहेत, जे या सेगमेंटमधील अन्य कारमध्ये मिळणार नाहीत.

मुंबई : किआ मोटर्सने आपली नवी एसयुव्ही Sonet चे अनावरण केले आहे. यावर्षी देशात येणाऱ्या बहुप्रतिक्षित कारपैकी ही एक कार आहे. Kia Sonet जबदस्त प्रतिस्पर्धी असलेल्या सब-कॉम्पॅक्ट (4-मीटर पेक्षा छोटी) एसयुव्ही सेगमेंटमध्ये येत आहे. या सेगमेंटमध्ये मारुती ब्रेजा आणि ह्यंदाई वेन्यू सह अनेक एसयुव्ही आधीपासूनच आहेत. किआ मोटर्स काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स( या सेगमेंटमधील कारमध्ये प्रथमच)च्या जोरावर या सेगमेंटमध्ये सॉनेटला स्थान मिळवून देण्याच्या तयारीत आहे. येथे आम्ही आपल्याला किआ सोनेटमध्ये मिळणाऱ्या टॉप-5 सेगमेंट फर्स्ट फीचर्सबाबत सांगणार आहोत.

१- वेंटिलेटेड सीट्स
सॉनेट एसयुव्हीमध्ये वेंटिलेटेड सीट्स मिळणार आहेत. या फीचरसह येणारी ही पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. सेल्टॉस प्रमाणे, यातही एअर-फ्लो साठी 3-लेवल सेटिंग्स सह वेंटिलेटेड चालक आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स दिल्या आहेत.


२- बोस प्रिमिअम सराउंड साउंड सिस्टिम
किआ सोनेटमध्ये  5 स्पीकर, 2 ट्विटर आणि 1 सब-वूफर सेट-अपसह  7.1 चॅनल बोस सराउंड साउंड सिस्टिम दिली आहे. यात सर्व दरवाज्यांना एक-एक स्पीकर आणि एक स्पीकर डॅशबोर्डमध्ये इंटिग्रेटेड आहे. तर दोन्ही ट्विटर ए-पिलर्स मध्ये आणि सब-वूफर एसयुव्ही बूट मध्ये दिला आहे. तर सराउंड साउंड सिस्टम किआ मोटर्सच्या सेल्टॉस एसयुव्हीत दिली आहे.

३ – 10.25-इंच HD टचस्क्रीन
सॉनेट एसयुव्हीत या सेगमेंटमधील सर्वात मोठी टचस्क्रीन असणार आहे. यात अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले आणि किआच्या UVO कनेक्टेड कार टेक्नॉलजीसह 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जी किआ सेल्टॉसकडून घेण्यात आली आहे.


४- इंटिग्रेटेड एअर प्युरिफायर
सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही ह्युंदाई वेन्यूमध्ये एअर प्युरिफायर मिळतो, पण किआ सॉनेटमध्ये फ्रंट सेंटर आर्मरेस्टमध्ये इंटिग्रेटेड स्मार्ट एअर प्युरिफायर दिला आहे. हे फीचर्सही सेल्टॉस एसयुव्हीकडूनच घेतलं आहे.


५- कूलिंग फंक्शनसह वायरलेस चार्जर
वायरलेस चार्जरच्या माध्यमातून स्मार्टफोन चार्ज केल्यानंतर फोन खूपच गरम होतो. सॉनेट एसयुव्हीमध्ये आपल्याला ही समस्या येणार नाही ह्यंदाई वेन्यूमध्ये वायरलेस चार्जर येतो, पण सॉनेट पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे, ज्यात कुलिंग फंक्शनसह वायरलेस चार्जर मिळेल.