mi band 5 will be launched in the indian market on september 29 2020 4 color options will be available
Mi Band 5 29 सप्टेंबरला भारतात होणार लाँच

प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Xiaomi भारतात 29 सप्टेंबर 2020 ला Mi Band 5 लाँच करणार आहे. कंपनी 29 सप्टेंबरला दुपारी १२ वाजता इंटलिजन्स ऑफ थिंग्स (IOT) बेस्ड काही उत्पादने भारतीय बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. पण, कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर, जाणून घेऊयात Mi Band 5 बाबत.

Mi Band 5 Specifications
>> 1.1 इंचाचा एमोलेड डिस्प्ले
>> युजर्सला मिळणार रिमोट-कंट्रोल कॅमेरा फीचर
>> बँड एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवस वापरता येणार
>> फिटनेस ट्रॅकर, हार्ट रेट सेन्सर आणि एक हेल्थ मोड
>> Mi Band 5 बिल्ट-इन मायक्रोफोनसह येणार,
>> यामुळे व्हॉइस कमांड देऊन ऑपरेट करणे शक्य होईल.
>> Mi Band 5 मध्ये 11 स्पोर्ट्स मोडचा समावेश
>> महिलांसाठी एक वेगळा हेल्थ मोड
>> युजर्सला फिटनेस बँड मध्ये सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, म्युझिक कंट्रोल, इनकमिंग कॉल्स, टेक्स्ट आणि वेदर अपडेट मिळणार

Price

चीनमध्ये Mi Band 5 चे नॉन NFC वेरियंट 189 युआन (जवळपास 2,000 ₹) आणि NFC वेरियंट 229 युआन (जवळपास 2,500 ₹) मध्ये लाँच झालं आहे. Mi Band 5 भारतात जवळपास 2,499 ₹ना लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा बँड ब्लॅक, ग्रीन, यलो आणि रेड रंगात उपलब्ध होणार आहे.