हा फोन वापरणाऱ्यांना अजूनही MIUI 12 ची प्रतिक्षा

भारतातील सर्वात मोठं मार्केट शेअर असणारी स्मार्टफोन कंपनी शाओमीने युजर्सला लेटेस्ट MIUI 12 ची अपडेट द्यायला सुरूवात केली आहे. या कस्टम युजर इंटरफेसमध्ये पूर्णपणे नवीन ऑप्टिमाइज्ड डिझाइन युजर्सला मिळतेच, सुपर वॉलपेपर आणि इंप्रूव्ड डार्क मोडसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. नवीन अपडेट अनेक कॅमेरा फीचर्सही ऑफर करणार आहे.

मुंबई : शाओमीचा कस्टम युजर इंटरफेस युजर्ससाठी अनेक आकर्षक फीचर्स घेऊन आला आहे. कंपनीने अलीकडेच MIUI 12 अपडेटचीघोषणा केली आहे आणि भारतातील युजर्ससाठी याची सुरूवातही झाली आहे. जर आपणही शाओमी युजर्स आहात आणि लेटेस्टअपडेटच्या प्रतिक्षेत असाल तर आम्ही आपल्यासाठी नवीन अपडेट लिस्ट आपल्यासाठी आणली आहे. रेडमी, Mi आणि पोको डिव्हाइसेजला MIUI 12 ची अपडेट मिळणार आहे, आपण लिस्ट पाहून जाणून घ्या.

शाओमी आपली लेटेस्ट MIUI 12 अपडेट काही बॅचमध्ये रोलआउट करणार आहे आणि याची सुरूवातही झाली आहे. प्रथम ही अपडेटयुजर्सला जूनमध्ये मिळणार होती पण काही कारणास्तव ती टाळण्यात आली आणि आता योग्य रितीने टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतरचऑगस्टमध्ये भारतात लाँच करण्यात आली आहे. आता फ्लॅगशिप डिव्हाइसपासून सुरुवात केल्यानंतर अन्य डिव्हाइलेजलाही ही अपडेट देण्यात येणार आहे. यात पूर्णपणे नवीन युआय व्यतिरिक्त ऑप्टिमाइज्ड परफॉर्मन्स आणि सुपर वॉलपेपर सारखे फीचर्स दिले आहेत. सोबतच नवीन कॅमेरा फीचर्सही या अपडेटमध्ये ॲड केले आहेत.

पहिली बॅच (ऑगस्ट)

– Redmi K20 Pro (आधीच रिलीज)
– Redmi K20 (आधीच रिलीज)
– Poco X2 (आधीच रिलीज)
– Mi 10 (अपडेट आउट)
– Redmi Note 9
– Redmi Note 9 Pro
– Redmi Note 8
– Redmi Note 8 Pro (अपडेट आउट)
– Redmi Note 7
– Redmi Note 7 Pro

दुसरी बॅच (सप्टेंबर-ऑक्टोबर)

– Poco M2 Pro
– Poco F1 (MIUI 12 For Poco F1)
– Redmi Note 7S
– Redmi 8
– Redmi 8A

तिसरी बॅच (नोव्हेंबर डिसेंबर)

– Redmi 7
– Redmi 7A
– Redmi 6 Pro
– Redmi 6
– Redmi 6A
– Redmi Note 5
– Redmi Note 5 Pro
– Redmi Y3
– Redmi Note 6 Pro