नेटाफिमचे शेतकऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध उपक्रम

नेटाफिम इंडिया ही नेटाफिमची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी शाश्वत उत्पादकतेसाठी आधुनिक सिंचन उत्पादने देणारी आघाडीची जागतिक कंपनी आहे.

मुंबई : नेटाफिम इंडिया ही नेटाफिमची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी शाश्वत उत्पादकतेसाठी आधुनिक सिंचन उत्पादने देणारी आघाडीची जागतिक कंपनी आहे. या कंपनीने डिजिटल क्रांती व कमी खर्चाच्या डिजिटल साधनांचा लाभ घेत शेतक-यांशी विविध प्लॅटफॉर्म्स आणि फॉरमॅट्समार्फत संवाद साधण्याच्या उद्देशाने नेटाफिम कृषी संवाद, नेटाफिम की पाठशाला आणि नेटाफिम टिप ऑफ द डे हे उपक्रम सुरू केले आहेत. 

नवीन डिजिटल अध्ययन आणि कन्टेंट अनुभवाची सुरुवात करणा-या या उपक्रमांमुळे ग्राहक व सहयोगींना कुठूनही नेटाफिममधील तज्ज्ञांशी संपर्क साधून कल्पनांचे आदानप्रदान करण्याची संधी मिळाली आहे. कोविड-१९ साथीमुळे प्रत्यक्ष संपर्कावर मर्यादा आलेल्या असताना, ऑडिओ, टेक्स्ट आणि व्हिडिओ मेसेजिंगसारखी माहितीचे आदानप्रदान करणारी डिजिटल साधने, शेतक-यांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात अत्यंत प्रभावी ठरत आहेत. कंपनीने अत्यावश्यक पेरणीपूर्व बाबींशी संबंधित सल्लागार सेवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशभरातील ८.५ दशलक्ष शेतक-यांचा एक समुदाय तयार केला आहे. गेल्या ६० दिवसांच्या ऑनलाइन संवादातून नेटाफिमने त्यांच्या सोशल मीडिया साइट्सवर सुमारे ९,५७६ सदस्य प्राप्त केले आहेत (वापरकर्त्यांमध्ये ४५ टक्के वाढ). 

नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान या उपक्रमाबद्दल म्हणाले, “नेटाफिम इंडिया कायमच भारतीय शेतक-यांची सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून काम करत राहिली आहे. हे उपक्रम कार्यान्वित करण्यापूर्वी आम्ही आमचे प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म्स कसे वापरतात याचे परीक्षण केले, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल असा कन्टेंट डिझाइन करू शकू आणि त्यांच्याशी संवाद साधणे सोपे होईल. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी लाभांमुळे एतद्देशीय पद्धतींनी समृद्ध व स्थानिक संदर्भांनी युक्त असे शास्त्रशुद्ध ज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. ऑनलाइन वापरकर्त्यांची संख्या वाढल्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आम्ही दुर्गम भागातील शेतक-यांना विविध पिकांविषयीचा महत्त्वाचा सल्ला योग्य वेळी व त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये देण्याचा निर्णय घेतला.”

कंपनीच्या कृषीशास्त्रज्ञांनी नेटाफिम कृषी संवाद या बहुभाषिक वेबिनार्सच्या चैतन्यपूर्ण मालिकेद्वारे शेतक-यांशी संवाद साधला आणि संभाव्य विस्तारीकरणासाठी यशोगाथांची उदाहरणे त्यांच्यापुढे ठेवली, नवीन कल्पना स्पष्ट केल्या. फेसबुकसारख्या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून, शेतक-यांना कापूस, हळद व केळीचे उत्पादन वाढवण्याकरिता ठिबक सिंचन प्रणालींच्या लाभांबद्दल शिक्षित करण्यात आले. प्रत्येक पीकचक्रासाठी जमिनीच्या मशागतीपासून सुरुवात करून पेरणी,  ठिबक सिंचन संचाची निवड व पाण्याचे व्यवस्थापन ते खत वापर या सर्व विषयांवर ज्ञानाधारित मालिकांमधून मुद्देसूद  माहिती देण्यात आली. तसेच सुक्ष्म-सिंचनाचे फायदे, शेतक-यांची जमीन व त्याचा वापर यांच्या आधारे उत्पादनांची निवड या विषयांवर प्रख्यात कृषीशास्त्रज्ञांनी घेतलेल्या सत्रांचाही यात समावेश होता. लाइव्ह सादरीकरणांसह प्रस्तुत शैक्षणिक मालिकेमुळे शेतक-यांना किमान हस्तक्षेपासह पीक उत्पादन यंत्रणा चालवणे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यात मदत झाली.  

याशिवाय, हे अधिक संवादात्मक तसेच रोचक व्हावे म्हणून कंपनीने नेटाफिम की पाठशाला या उपक्रमाच्या माध्यमातून यूट्यूबवर व्हिडिओंची मालिका सुरू केली. या मालिकेतून आधुनिक ठिबक सिंचन प्रणालींच्या फायद्यांबाबत सखोल ज्ञान शेतक-यांना देण्यात आले. 

“भारतातील अर्थव्यवस्था बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे आणि कोविड-१९ साथीमुळे या क्षेत्रातील अनेक उपक्रमांवर मर्यादा आल्या आहेत, पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. सरकारने शेतीला लॉकडाउनमधून सवलत दिलेली असली, तरी शेतक-यांना शेतीतील कामांबाबत सल्ला घेण्यात तसेच त्यांच्या उपजीविकेची साधने साथीनंतरच्या काळात सुधारण्यासाठी काही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकरी समुदायाला संपूर्ण मदत करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे, जेणेकरून साथीने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना आपण सगळे मिळून करू शकू,” असे चौहान म्हणाले. 

नेटाफिम कृषी संवाद या उपक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी या लाइव्ह वेबिनार्सबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वेबिनार्स सुरू असताना कमेंट विभागात भरभरून प्रतिक्रिया येत होत्या. हे वेबिनार्स योग्य वेळी घेण्यात आले आहेत, माहितीपूर्ण आहेत व त्यांचा लाभ घेणे सुलभ आहे अशा प्रतिक्रिया येत होत्या. नेटाफिमचे कृषीशास्त्रज्ञ यशदीपसिंग गिरासे यांनी घेतलेल्या लाइव्ह सत्राची प्रशंसा करताना महाराष्ट्रातील वाशिम येथील एक शेतकरी संदीप देशमुख म्हणाले, “शास्त्रशुद्ध माहिती आणि साधने थेट उपलब्ध झाल्यामुळे आमच्या हळदीच्या पिकाचे उत्पादन चांगले येण्यात मदत होऊ शकेल.” गुजरातमधील पाटीदार सुरेश कुमार विरानी म्हणाले, “हे सत्र ठिबक सिंचन वापरणा-या शेतक-यांसाठी खूपच उपयुक्त होते. कारण, त्यामुळे पेरणीसाठी अधिक निकोप स्थिती निर्माण होते आणि वेळ व पैशाची बचत करून अधिक उत्पादन मिळवता येते.”

ठिबक सिंचन पद्धती वापरल्यामुळे जास्तीत-जास्त उत्पादन मिळवण्यात मदत होईल आणि त्यायोगे वाढीची संधी मिळेल, असे शेतक-यांना वाटत आहे. तसेच नेटाफिम उत्पादने वापरण्याचे अनुभवही शेतक-यांनी सांगितले आणि काही कस्टमाइझ्ड स्वरूपाची माहितीही विचारली; काही शेतक-यांनी पुढील वेबिनार्ससाठी विषयही सुचवले आहेत. तेलंगणामधील यदाद्री येथील कोंडाल यांनी त्यांच्या ६ एकरांच्या आंब्याच्या बागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर या विषयावर सत्र घेण्याची मागणी केली आहे. शेतक-यांनी दाखवलेल्या उत्साहामुळे नेटाफिम इंडियाने मिरची, भुईमूग, तांदूळ, टोमॅटो, ऊस, कांदा, पपई, डाळिंब आणि आणखी काही पिकांसाठी लाइव्ह सत्रांचे आयोजन केले आहे. ही सत्रे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात घेतली जातील.