Nokia चे भारतात येणार 32 इंच आणि 50 इंच स्क्रीन टीव्ही!

नोकिया लवकरच भारतात आपले नवे स्मार्ट टीव्ही आणण्याच्या बेतात आहे. नोकियाचे दोन टीव्ही BIS सर्टिफिकेशन साइटवर दिसले आहेत.

मुंबई : नोकिया आणि फ्लिपकार्टने देशात अलीकडेच 43 इंच, 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन साइझचे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. आता एचएमडी ग्लोबलचा मालकी हक्क असलेली नोकिया काही आणखी स्मार्ट टीव्ही भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. 32 इंच आणि 50 इंच स्क्रीन साइझच्या नोकिया स्मार्ट टीव्हीवर काम सुरू आहे आणि याची BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर नोंद झाली आहे.

नोकिया पावरयुजरच्या एका अहवालानुसार, ३२ इंच नोकिया स्मार्ट टीव्हीची 32TAHDN मॉडल नंबरने यादीत नोंद झाली आहे. यादीत टीव्हीत फुल एचडी रिझोल्युशन स्क्रीन असण्याबाबत माहिती दिली आहे. फुल एचडी रिझोल्युशन स्क्रीनसह येणारा हा नोकियाचा पहिला टीव्ही असणार आहे. तर 50TAUHDN मॉडल नंबरने यादीत समाविष्ट झालेल्या दुसऱ्या नोकिया टीव्हीत UHD रिझोल्युशन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

32 इंचाचा नोकिया स्मार्ट टीव्ही कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही असण्याची शक्यता आहे. 43 इंच स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 31,999 रुपये आहे. नोकिया  32 इंच टीव्ही 21,999 रुपयांच्या आसपास लाँच होण्याची शक्यता असून  50 इंच स्क्रीन टीव्हीची किंमत 36,999 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नोकियाच्या या टीव्हीत JBL स्पीकर्स, इंटेलिजंट डिमिंग, DTS ट्रूसराउंड आणि डॉल्बी ऑडियो सारखे फीचर्स असणार आहेत. हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमसह येतील आणि यात गुगल असिस्टंट व्हॉइस कमांड इंटरफेस मिळणार आहे.

नोकियाचे हे स्मार्ट टीव्ही  ‘Nokia PureCinema televisions’ फॅमिलीचाच भाग असणार आहेत. हे सर्व नोकिया स्मार्ट टीव्ही ‘Clear’ आणि ‘Pure’ ब्रँडिंगसोबत येतील.