Oppo F17 सीरीजचे स्मार्टफोन आज भारतात होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी Oppo आज भारतीय बाजारात आपला स्मार्टफोन Oppo F17 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीजमध्येOppo F17 आणि Oppo F17 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनबाबत आतापर्यंत अनेक टीजर्स समोर आले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये युजर्सला उत्तम फोटोग्राफीचा आनंदासोबतच दमदार पावर बॅकअपही मिळणार आहे. अधिक जाणून घेऊया या फोनबाबत.

Oppo F17 Pro Specification:

Oppo F17 Pro स्मार्टफोन मध्ये एकूण 6 कॅमरे आहेत. यात चार मागील बाजूस आणि दोन फ्रंट कॅमेरे असणार आहेत. यात 6.43 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात येणार आहे. याशिवाय 30W VOOC Flash Charge 4.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप सी पोर्टची सुविधा मिळेल. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio P95 चिपसेट आहे.या स्लिम स्मार्टफोनची जाडी 7.48mm आहे.

Oppo F17 Specification :

Oppo F17 मध्ये क्वाड रियर कॅमरा दिला आहे. याचा प्राइमरी कॅमरा 16MP चा असणार आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर वर कार्यरत असेल आणि पावर बॅकअपसाठी यात 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीने Oppo F17 सीरीजचे फोन ब्लू, ऑरेंज, नेव्ही ब्लू आणि व्हाइट रंगातील वेरियंट्स मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. इस स्मार्टफोन मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल.

Oppo F17 And Oppo F17 Pro Price :

Oppo F17 आणि Oppo F17 Pro च्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही पण टीजरच्या माध्यमातून याची किंमत 25,000 रुपयांहून कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.