Poco X3 Pro and Poco F3 Specifications, Release Date

हँडसेट निर्माता कंपनी पोकोचे दोन नवीन स्मार्टफोन Poco X3 Pro आणि Poco F3 ला या महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोन्सला आधीच अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट करण्यात आले आहे. टिप्स्टर Sudhansu Ambhore ने ट्वीट करून या आगामी स्मार्टफोनच्या संभावित किंमतीची माहिती दिली आहे. या फोनला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाऊ शकते.

    या फोनच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत EUR 250 (जवळपास 21 हजार 600 रुपये) आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत EUR 300 (जवळपास 26 हजार) असू शकते. टिप्स्टर ने 91Mobiles सोबत मिळून ही माहिती देण्यात आली आहे की, या फोनला दोन व्हेरियंटमध्ये बाजारात उतरवले जाऊ शकते.

    6 जीबी रॅम प्लस 128 जीबी आणि 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज मध्ये याला लाँच केले जाऊ शकते. टिप्स्टरने हाही दावा केला आहे की, पोको एक्स 3 प्रो स्मार्टफोनच्या तीन कलर व्हेरियंट असू शकतात. ब्लॅक, ब्लू, आणि ब्राँज. टिप्स्टर मुकुल शर्माने ट्विट करून हेही सांगितले की, मलेशियात SIRIM सर्टिफिकेशन साइट वर मॉडल नंबर M2012K11AG सोबत पाहिले गेले आहे.

    आगामी पोको मोबाइल फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी क्वॉलकॉम 860 प्रोसेसर आणि फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5200 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनला फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येऊ शकतो.

    फोनमध्ये 5 जी ऐवजी 4 जीब एलटीई कनेक्टिविटी सपोर्ट दिला जाणार आहे. Poco F3 फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टिटास्किंग फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आणि 4520 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.